माळशिरस – गोरडवाडी ता माळशिरस राखीव गट ४६८ नं. जि. सोलापूर या क्षेत्रात अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे फॉरेस्ट क्षेत्राला आग लागली आहे. संबंधीत अधिकारी यांचेवर कारवाई का करण्यात येऊ नये असे निवेदन महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री यांना ग्रामस्थांनी पाठवले आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की , मौजे गोरडवाडी राखीव गट ४६८ नं.-या प्रमाणे अक्षांश १७.७९१२४ रेखांश ७४.७९८३ दि.२६/१२/२०२५ वेळ १६.०५ मी या घटनास्थळी फॉरेस्ट गार्डच्या गलथान कारभारामुळे (हलगर्जीपणामुळे) फॉरेस्ट क्षेत्राला आग लागली आहे. हकीगत अशी की वनविभागामध्ये राखीव फॉरेस्ट क्षेत्रामध्ये गवताचे प्रमाण या हंगामामध्ये भरपुर गवत वाढलेले व वाळलेले असते या फॉरेस्ट क्षेत्रालगत व आतील रस्त्यालगत नोव्हेबर व डिसेंबर महिन्यात जाळरेषा फॉरेस्ट खात्यामार्फत रोजगार लोक लाऊन जिल्हा हद्द व जिल्हाअंतर्गत फॉरेस्ट क्षेत्राच्या आतील व बाहेरील बाजूस जाळ रेषा काढणे गरजेचे असते. जाळरेषा काढणेसाठी गावातील मजुर लाऊन रात्रीच्या वेळेला जाळरेषा काढणे गरजेचे असते. ते कृतीत (जागेवर) न लावता कागदावरच कागदी घोडे नाचवून जवळचे नातेवाईक फॉरेस्ट गार्डच्या हीतसंबंध व रोजंदारी वॉचमन यांच्या नातेवाईकांच्या नावावर ३२ नंबर भरुन बिले तयार करुन पैसे काढून घेऊन हे अधिकारी संगणमताने करतात व जागेवर जाळरेषेचे काम जे फॉरेस्ट क्षेत्रामध्ये रोजंदारी मजूर
वॉचमन) म्हणून कामावर आहेत. त्यांचेकडून दिवसा व रात्री मोफत जाळरेषा काढून घेतात अद्याप कोणतीही जाळरेषा काढली नसल्याने या फॉरेस्ट क्षेत्राजवळ असलेला लाईट इलेक्ट्रिक डिपी रविंद्र फरांदे व यांचे नातेवाईक यांचे रानालगत आहे. लाईटच्या शॉर्ट सर्किट मुळे ही लागली आहे.
सदर प्रकरणी इलेक्ट्रिक बोर्ड, शेतमालक तसेच फॉरेस्ट गार्ड व इतर यांचेवर सखोल चौकशी करुन कारवाई का करण्यात येऊ नये. या आगीमध्ये कीतीतरी निष्पाप पक्षी प्राणी, सरपटणारे प्राणी मृत्युमुखी पडलेले आहेत. अधिकारी आपला बचाव करण्याकरीता तात्पुरत्या स्वरुपात कागदोपत्री अज्ञात व्यक्तींच्या नावे गुन्हा दाखल करतात. व नंतर आरोपी आढळून येत नाही म्हणून हे प्रकरण बंद करतात तरी संबंधीत फॉरेस्ट गार्ड व इतर डेपो मालक व रानमालक या संबंधीतांवर कारवाई करण्यात यावी. या निवेदनाच्या प्रती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वन विभागाचे मुख्य सचिव व उप वन संरक्षक सोलापूर माळशिरस तालुका वनाधिकारी यांना पाठवण्यात आले आहेत.























