परतूर / जालना – माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर हे नेहमीच शेतकऱ्यांच्या सर्व समस्या विषयी आग्रही राहिले असून त्यांनी माझ्या सर्व संचालक मंडळाला सूचना देऊन हमीभावाने शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी करता यावे यासाठी केंद्र सुरू करण्याच्या सूचना केल्या होत्या.
त्यांनी केलेल्या सूचनांचे पालन करून कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नाफेडच्या माध्यमातून सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र सुरू केले असल्याचे भाजपा प्रदेश सचिव राहुल लोणीकर यांनी सांगितले
ते परतुर येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने सोयाबीन हमीभाव केंद्राच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की खुल्या बाजारामध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या सोयाबीन मालाला 4500 रुपये पर्यंत चा भाव मिळत आहे मात्र नाफेड च्या माध्यमातून 5328 रुपये हा हमीभाव सोयाबीन विक्री त्या शेतकऱ्यांना मिळणार असून कुठलीही अडीअडचण असल्यास शेतकऱ्यांनी थेट आपल्याशी संपर्क साधावा अशी ही यावेळी बोलताना त्यांनी सांगितले.
आमदार लोणीकरांचा स्थायीभाव शेतकऱ्यांना सुविधा देणे हा असल्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती म्हणून आम्ही आमच्या कर्तव्यात कधी कसूर करणार नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांना उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्यावर आमचा भर असल्याचे यावेळी बोलताना त्यांनी नमूद केले
या कार्यक्रमाला उपसभापती संभाजी वारे , शत्रुघ्न कणसे संपत टकले




















