सोलापूर : काँग्रेसचे माजी खासदार तथा विद्यमान बीआरएस नेते धर्मण्णा मोंडय्या सादूल (वय ८३) यांचे बुधवारी पावणे बारा दरम्यान एका खाजगी रुग्णालयात निधन झाले. मागील अनेक दिवसांपासून ते आजारी होते. पश्चात पत्नी, 2 मुले, 1 मुलगी, सूना नातवंडे असा परिवार आहे.
1989 साली ते पहिल्यांदा काँग्रेसकडून खासदार झाले. त्यानंतर, ते पुन्हा 1991 साली पुन्हा सार्वत्रिक निवडणुकीत ते सोलापूरचे खासदार झाले, माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांच्याही काळात ते खासदार होते. नरसिंह राव यांचे ते निकटवर्तीय म्हणून ते ओळखले जायचे. काँग्रेसकडून ते दोनदा खासदार झाले. यंत्रमाग धारक संघाचे ते विद्यमान अध्यक्ष होते.