माहूर – पिरॅमिड स्पिरिच्युअल सोसायटी मुव्हमेंट, ध्यान केंद्र माहूरच्या वतीने निःशुल्क पिरॅमिड ध्यान शिबिराचे आयोजन आज रविवार दि.२५ जानेवारी रोजी स्थानिक बालाजी मंगलम् याठिकाणी दोन सत्रात करण्यात आले आहे.या शिबिराला रिद्धी सिद्धी पिरॅमिड ध्यान केंद्र, नांदुरा येथील वरिष्ठ पिरॅमिड मास्टर सौ. देवयानी नवगजे यांचे प्रमुख वक्ता म्हणून मार्गदर्शन लाभणार आहे.
प्रख्यात ध्यानगुरु ब्रम्हर्षी सुभाष पत्रीजींनी स्थापन केलेली महाराष्ट्र पिरॅमिड स्पिरिच्युअल सोसायटीज मूव्हमेंट’ (PSSM) ही एक निधर्मी,ना-नफा अध्यात्मिक चळवळ आहे. ज्याचा उद्देश ध्यान, शाकाहार आणि पिरॅमिड ऊर्जेचा प्रचार करणे आहे. पिरॅमिड मेडिटेशन चॅनल (PMC) द्वारे ज्ञानाचा प्रसार केला गेला. याद्वारे आज जगभरात निःशुल्क ध्यान केंद्र चालविले जात असून, माहूर येथे पिरॅमिड स्पिरिच्युअल सोसायटी मुव्हमेंट अंतर्गत चालविले जात असलेल्या ध्यान केंद्राच्या वतीने आज रविवारी निःशुल्क पिरॅमिड ध्यान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.शिबिराचे प्रथम सत्र सकाळी १० ते ०१ तर दुपारी ०२ ते ०४ वाजेपर्यंत द्वितीय सत्र असणार आहे. दोन्ही सत्राच्या मधल्या वेळेत दुपारी ०१ ते ०२ दरम्यान उपस्थितांसाठी अन्नप्रसाद आयोजित करण्यात आला आहे.
पिरॅमिड ध्यान शिबिर हे पिरॅमिडच्या रचनेखाली किंवा आत बसून ‘आनापानसती’ (श्वासावर लक्ष केंद्रित करणे) ध्यान करण्याची एक विशेष पद्धत आहे. यात पिरामिडच्या आकाराच्या विशेष रचनांमुळे वैश्विक ऊर्जा केंद्रित होते, ज्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्यास,मन शांत होण्यास आणि गहन ध्यानावस्थेत लवकर जाण्यास मदत होते. पिरॅमिडच्या आकारामुळे सभोवतालची सकारात्मक ऊर्जा एका ठिकाणी केंद्रित होते, जी सामान्य ध्यानाच्या तुलनेत तिप्पट ऊर्जा प्रदान करते.या शिबिरात कोणतेही मंत्र किंवा देवतांची पूजा न करता, केवळ नैसर्गिक श्वासाचे निरीक्षण केले जाते.
तणाव कमी होणे, चांगली झोप लागणे, शरीरातील वेदना कमी होणे, आणि मानसिक स्पष्टता वाढणे हे याचे प्रमुख फायदे आहेत.
तसेच पिरॅमिड ध्यान शिबिर हे शरीर, मन आणि आत्मा यांच्या संतुलनासाठी आणि आंतरिक शांतीसाठी आयोजित केलेला एक आध्यात्मिक उपक्रम आहे.ध्यान केल्याने,आरोग्य सुधारते व मनःशांती वाढते.आपण सकारात्मक होतो.आपली कार्यक्षमता वाढते.आपले नातेसंबंध मधुर होतात.आर्थिक समृद्धी मिळते.आपण स्वतःवर प्रेम करायला शिकतो.आपल्याला जीवनाचा खरा अर्थ समजतो. अशाप्रकारचे फायदे असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.
या पिरॅमिड ध्यान शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक गोपाल तिवारी,
भारत बेहेरे, जितेंद्र भारती, डॉ. राम कदम,श्रीमती शोभाताई महामुने,
नारायण मडपल्लीवार,
प्रमोद राठोड,बळीराम परसवाळे,विनायक कान्नव,
रामराव राठोड,गमे पाटील,
राजाराम पस्पुलवार,उमेश जाधव,संतोष सावळकर,
विश्वजित जाधव, विजय तिवसकर,अवधुत लांडे,
विजिगिरी दिनेश गंगाराम,
संजय आराध्ये,राजु जाधव,
सुनिल वाघमारे,सुनिल गजांकुशकर,दिप भलगे, शैलेश कदम यांनी केले आहे.

























