भोकर(प्रतिनिधी)शेतात दिवस रात्र काम करुन आई वडिलांनी तूमच्या शिक्षणाचा खर्च उचलतात त्यांच्या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करुन अभ्यास करा व कोणत्याही क्षेत्रात नाव कमवा असे मार्गदर्शन प्रा.विठ्ठल कांगणे सर विद्यार्थ्यांना केले ते शाहू विद्यालयामध्ये कै.माजी आ.बापूसाहेब गोरठेकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजीत करण्यात आलेल्या सांस्कृतीक कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष लाल बहादूर शास्री शिक्षण संस्थेचे सचिव शिरीषराव गोरठेकर हे होते प्रमूख अतीथी नांदेड जिल्हा बँकेचे संचालक कैलासराव देशमूख गोरठेकर प्राचार्य संजय देशमूख कामनगावकर आदीची उपस्थिती होती उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा.कांगणे म्हणाले कि तूम्ही रील लाईफ ला महत्व न देता रीअल लाईफ ला महत्व देण्याचा प्रयत्न करा मोबाईल पासून दूर रहा
स्टेटस ठेवल्याने तूमचं स्टेटस बनत नाही तर तूम्ही शैक्षणिक जिवनात अफाट मेहनत करा लक्ष देवून अभ्यास केल्यास निश्चित यश तर मिळेलच तूमच्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण होतील असे सांगून प्रत्येक गोष्ट ज्यांना सहज मिळत असते त्यांना महत्व वाटत नाही तर तीच गोष्ट मिळविण्यासाठी ज्यांना संघर्ष करावा लागतो बिकट परिस्थितीला सामोरे जावे लागते संघर्षातून जाणारा विद्यार्थी एक दिवस निश्चित आपल्या ध्येया पर्यंत पोहचतो असे ते म्हणाले यावेळी शाहू विद्यालयातील मूले मूली पालक शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.