नवीन नांदेड – सार्वजनिक बांधकाम विभाग नांदेड पुनर्वसन योजनेअंतर्गत भायेगाव व किकी या दोन्ही गावातील अंतर्गत सीसी रस्ते व नाली बांधकाम या कामाचा भूमिपूजन सोहळा दिनांक २२ जानेवारी रोजी दक्षिणचे आमदार आनंदराव पाटील बोंढारकर यांच्या हस्ते पार पडला. यावेळी बोलताना बोंढारकर म्हणाले की भायेगाव व किकी ही गावे मी दत्तक घेतल्यासारखे आहेत या गावांना मी विकास कामासाठी निधी कधीच कमी पडू देणार नाही असे मत आमदार बोंढारकर यांनी व्यक्त केले.
नांदेड तालुक्यातील व शहरानजीक असलेल्या भायेगाव येथील विकास कामाच्या भूमिपूजन सोहळा दिनांक २२ जानेवारी रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग नांदेड पुनर्वसन अंतर्गत सीसी रस्ते व नाली बांधकामासाठी ८४ लाख एवढा निधी
दक्षिणचे आमदार आनंदराव पाटील बोंढारकर यांनी दिला. व येथील कामाचे भूमिपूजन सोहळा ग्रामस्थांच्या उपस्थित पार पडला.
यावेळी बोलताना आमदार बोंढारकर म्हणाले की हे गाव मी दत्तक घेतल्यासारखे आहे म्हणून येथे विकास कामासाठी निधी कमी पडू देणार नाही. यावेळी ग्रामपंचायत सरपंच सविता खोसडे, उद्धव पाटील शिंदे, सुहास खराणे, शिवाजी कदम, सुदीन बागल, गंगाधर खोसडे,उत्तम खोसडे, विठ्ठल खोसडे ,संभाजी खोसडे ,पांडुरंग कोचार, मारोती खोसडे, प्रभू पाटील कोल्हे, शिवानंद पाटील खोसडे, राजु खोसडे,गौतम भालेराव,बाबुराव कोल्हे, शंकर कोल्हे, माधव कोल्हे, दत्ता पाटील शिंदे, नारायण देशमुख, रामराव निळकंठ, उमाताई खोसडे यांच्यासह गावकऱ्यांची मोठी उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक बालाजी पाटील भायेगावकर यांनी केले.तसेच यावेळी किकी गावातही सार्वजनिक बांधकाम विभाग नांदेड पुनर्वसन योजनेअंतर्गत १ कोटी ८ लाख रुपये एवढा निधी आमदार बोंढारकर यांनी दिला.
यावेळी आपल्या भाषणात बोलताना किकी गावासाठी यापुढेही विकास कामासाठी निधी कमी पडू देणार नाही. तसेच येथील महिला बचत गटांसाठी महिला बचत गट कार्यालय बांधकामास निधी देण्याचे आश्वासन दिले. यावेळी या सोहळ्याचे अध्यक्ष बाबुराव देशमुख , ग्रामपंचायतचे सरपंच रवी देशमुख, व्यंकट देशमुख, अर्जुन देशमुख, शिवाजी तेलंगे, चांदु देशमुख, गोविंद तेलंगे, विठ्ठल खोसडे, नवनाथ देशमुख, बालाजी देशमुख, काझी सर, दिलीप देशमुख, मोहनराव देशमुख, संजय देशमुख अमृत मगरे, साहेबराव देशमुख, भुजंगराव देशमुख यांची उपस्थिती होती.
या दोन्ही गावातील या कामाचे गुत्तेदार तथा इंजिनियर सतीश पाटील चितळकर, इंजि. मारुती कदम, इंजि. जयपाल मोरे, अमोल राजूरकर, मंगेश कदम, राजू लालने, संदीप चितळकर, अमोल अहमद, प्रसाद पेटकर हे कामकाज पाहणार आहेत.

























