नांदेड – भाजपा नांदेड ओबीसी मोर्चाचा जिल्हा उपाध्यक्षपदी सक्रीय,सामाजिक कार्यकर्ते गणेश काकडे यांची अमर राजूरकर यांच्या उपस्पथित एका नियुक्ती पत्राव्दारे करण्यात आली आहे.
नांदेड वाघाळा शहर प्रभाग क्रमांक १९ जुना कौठा येथील भाजपाचे सक्रीय तथा सामाजिक कार्यकर्ते गणेश धोडींबाराव काकडे यांच्यी नियुक्ती माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण , खासदार अजित गोपछेडे व संघटक मंत्री संजय कौडगे,भाजपा महानगर जिल्हा अध्यक्ष अमर राजूरकर यांच्या आदेशानुसार गणेश काकडे नियुक्ती करण्यात आली.
यावेळी महानगर अध्यक्ष अमर राजुरकर, शितल खांडील, माजी नगरसेविका ललिता शिंदे उपस्थिती होती.सदरील नियुक्ती बदल सामाजिक, राजकीय, मित्र मंडळी यांच्या कडुन अभिनंदन होत आहे.
















