सोलापूर – देशी बनावटीचे पिस्टल व काडतुस विक्री करणारी टोळी जेरबंद करण्यात आली. यामध्ये देशी बनावटीचे 3 पिस्टल 5 जिवंत काडतुस जप्त करण्यात आले असून एकुण 1 लाख 71 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी की, सपोनि/विशाल वायकर व त्यांच्या तपास पथकाने खात्रीशीर माहिती काढली की, विकास कैलास वजाळे रा. अण्णाभाऊ साठे नगर परिते ता. माढा हा त्याचेकडील पिस्टल व राउंड घेवून एच पी पेट्रोल पंप परिते येथे विक्री साठी येणार आहे. त्याप्रमाणे परिते ते टेंभुर्णी जाणारे रोड लगत सषंयीत इसम दिसून आल्याने त्यास पथकाने ताब्यात घेतले. चौकषी केली असता विकास कैलास वजाळे वय 31 वर्षे, रा. अण्णाभाऊ साठे नगर परिते ता. माढा जि. सोलापूर असे नाव असल्याचे सांगितले. सदर इसमाची झडती घेतली असता त्याचे कमरेला खोवलेले 1 देशी बनावटी पिस्टल मॅगझाीनसह व 1 जिवंत काडतुस त्याचे ताब्यात मिळुन आली. आरोपीकडे अधीक तपास करता केल्यानंतर रज्जीत उर्फ गोलू रा. धुळे याचे कडुन विक्री करण्याकरीता 4 देशी बनावटीचे पिस्टल व राउंड काही दिवसापुर्वी आणले असल्याची माहिती समजून आली. आरोपी विकास वजाळे याचे घराची झडती घेतली असता घरझडतीत 1 पिस्टल व 4 राउंड मिळून आले. आरोपी विकास वजाळे याचेकडे अधिक तपास करत असताना त्याने यापूर्वी अक्षय अशोक धोत्रे वय 31 रा. सुमित हॉटेलच्या पाठीमागे टेंभुर्णी तालुका माढा यास आणखी 1 देशी बनावट पिस्टल विक्री केल्याची माहिती दिली. त्यावरून 3 रे पिस्टल देखील जप्त करण्यात आले. या कारवाईत एकुण 03 देशी बनावट पिस्टल व 5 राउंड असा एकूण 1,71,000/- रू किंमतीचा मुद्देमाल मिळाला. तसेच त्याचेकडील चौथे पिस्टल हे राम आनंता कांबळे, रा. टेंभूर्णी यास विक्री केल्याचे निश्पन्न आहे. या आरोपी विरुद्ध टेंभुर्णी पोलीस ठाणे गुरनं 69/2026 भारतीय शस्त्र अधीनियम 1959 चे कलम 3,7,25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि/विशाल वायकर नेम. स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर हे करीत आहे.
सदर गुन्ह्यात आरोपी विकास कैलास वजाळे रा. अण्णाभाऊ साठे नगर परिते ता. माढा व अक्षय अशोक धोत्रे वय 31 रा. सुमित हॉटेलच्या पाठीमागे टेंभुर्णी तालुका माढा यांना अटक केली असून त्यांना आज रोजी न्यायालयात हजर केले असता त्यांची 2 दिवस पोलीस कोठडी रिमांड मंजूर केली आहे.
सदरची उल्लेखनीय कामगिरी अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, प्रितम यावलकर, अपर पोलीस अधीक्षक, अंजना कृष्णा व्ही. एस, सहा. पोलीस अधीक्षक, करमाळा विभाग यांचे मार्गदर्शनाखाली संजय जगताप, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण यांचे नेतृत्वाखाली सहा. पोलीस निरीक्षक / विशाल वायकर, व पथकातील श्रेणीपोसई/श्रीकांत गायकवाड, पोहेकॉ सलीम बागवान, विरेश कलशेट्टी, पोकॉ/राहुल दोरकर, हरीष थोरात, बाळासाहेब घाडगे, अन्वर अत्तार, सुनिल पवार यांनी बाजवली आहे.


















