तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन बसस्थानक परिसरात आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या हस्ते आदिवासी समाजाचे जननायक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन झाले.
जुन्या बसस्थानकापर्यंत शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी आदिवासी समाजाची ओळख असलेल ढेमसा नृत्यसह पारंपरिक पेहराव आकर्षणाचे केंद्र होते . येथील जिल्हा परिषद शाळेत आदिवासी दिनाचा समारोप कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी स्वातंत्र्य सैनिक पुंडलिकराव भिसे होते.प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विवेक देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य संभाजी लांडगे, आदिवासी पॅंथर संघटनेचे धनराज सोनटक्के, प्रा.के.के. वानोळे, माजी उपसभापती मनोहर माहुरे हे होते. यावेळी निसर्गपूजक समाजाची ओळख जपणाऱ्या महिलांचा रोपटे देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधव झाडे यांनी केले. आभार नामदेव भिसे यांनी मानले. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सहदेव खेडकर, सहाय्यक फौजदार अशोक सिंगनवाड, निवृती धुमाळे, रामप्रसाद हुरदुखे, जनार्धन ढोले,प्रशांत अंभोरे, सरपंच तानाजी गायकवाड, सरपंच हेमंत नरवाडे, सरपंच जिगाजी वानोळे, सरपंच सुरेश ठाकरे, सरपंच माधव धनवे, सरपंच पारसराम नाईक, सरपंच सुदाम डोकले, सरपंच सुभाष गारोळे, विश्वम्भर मेटकर मनोहर मूरमुरे,प्रल्हाद मेटकर, गोकुळ पांडे, चंद्रकांत हुरदुखे,अविनाश ढोले आदी मान्यवरांसह अनेक गावातील समाज बांधव उपस्थित होते.