माळशिरस – गोपाळराव देव प्रशालेला १२ परीक्षा केंद्र मंजूर झाले असून परीक्षा केंद्र मंजूर झाल्याने विद्यार्थी पालकामधून समाधान व्यक्त होत असल्याची माहिती संस्थेचे कार्याध्यक्ष मिलिंद कुलकर्णी यावेळी मुख्याध्यापक धनंजय केसकर उपस्थित होते.
१९५७ मध्ये सथापन झालेल्या संस्थेत सन १९८६ -१९८७ मध्ये १२ वी सुरु झाली .परंतु विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी सदाशिवनगर येथे जावे लगत होते .३९ वर्षानंतर या शाळेला १२ परीक्षा केंद्राची मंजुरी मिळाली आहे..या शाळेच्या सर्व वर्ग खोल्याच्या बाहेर संरक्षित भिंत असून प्रत्येक वर्गामध्ये सी सी.टीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत .येत्या १० फेब्रुवारी पासून १२ परीक्षेला सुरुवात असून त्यादृष्टीने सर्व तयारी करण्यात आल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले .
प्रियंका सरगर विद्यार्थिनी १२ वि सायंन्स
आमच्या शाळेत परीक्षा केंद्राला मंजुरी मिळाली असल्याने आमचा माळशिरस वरून सदाशिवनगर ला जाण्याचा वेळ वाचणार आहे.तसेच प्रवास खर्च वाचणार आहे.या भागातील विद्यार्थ्यांचे पालक शेतकरी आहेत..आपल्या पालकांना परीक्षा केंद्रात नेऊन परीक्षा पेपर संपेपर्यत त्या ठिकाणी थांबावे लागणार होते .केंद्र सुरु झाल्याने पालकांचा नाहक हेलपाटा व वेळ वाचणार आहे.
दिपक गेंड विद्यार्थी १२ सायन्स
या ठिकाणी परीक्षा केंद्र सुरु झाल्याने चांगली सोय झाली आहे.सदाशिवनगर परीक्षा केंद्राकडे जाण्याचा वेळ वाचणार आहे.जाण्या येण्या मध्ये १ तास वेळ जाणार होता तो वाचून अभ्यास करण्यास वेळ मिळणार आहे.
फोटो मिलिंद कुलकर्णी
दीपक गेंड. प्रियंका सरगर




















