राज्यपाल रमेश बैस यांनी मुंबईत राजभवन इथं आयोजित योगाभ्यास कार्यक्रमात सहभागी होत, योग प्रात्यक्षिकं केली. पत्र सूचना कार्यालय आणि सागरी सुरक्षा दलाचे अधिकारी, कर्मचारीही यात सहभागी झाले होते. योग ही भारतानं संपूर्ण जगाला दिलेली देणगी आहे, हा सांस्कृतिक वारसा जपून मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी रोज योगाभ्यास करावा, असं आवाहन राज्यपाल यांनी यावेळी केलं. . राज्यात योग दिनाचा मुख्य कार्यक्रम मंत्रालयातल्या त्रिमूर्ती प्रांगणात झाला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी योगासनं केली.
योगाभ्यासामुळे मन कायम ताजतवानं राहातं त्यामुळे दररोज योगाभ्यास करावा असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. योगाभ्यासांना कार्यक्षमता देखील वाढते असं ते म्हणाले.
मुंबईत गेट वे ऑफ इंडिया परिसरात मुंबई बंदर प्राधिकरण आणि पंतजली योग समितीच्या वतीनं योगाभ्यासाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योगाभ्यास केला.