वैराग – तालुक्यातील येळंब येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री भगवंताच्या कृपेने आणि समस्त ग्रामस्थांच्या सहकार्याने २५ व्या (रौप्य महोत्सवी) अखंड हरिनाम सप्ताहाचे अत्यंत उत्साहात आयोजन करण्यात आले आहे. दि. १९ जानेवारी २०२६ पासून सुरू झालेल्या या सप्ताहाची सांगता दि. २५ जानेवारी २०२६ रोजी भव्य महाप्रसादाने होणार आहे.
सप्ताहाच्या निमित्ताने गावात मंगलमय वातावरण असून दररोज पहाटे ४ ते ६ काकडा भजन, सकाळी ९ ते १० विष्णू सहस्त्रनाम, १० ते १२ गाथा भजन, दुपारी भोजन व विश्रांती, सायंकाळी ६ ते ७ हरिपाठ, रात्री ९ ते ११ कीर्तन आणि रात्री ११ ते ४ हरिजागर असे भरगच्च कार्यक्रम पार पडत आहेत.
या धार्मिक सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे ‘झाशीची राणी महिला ग्रामसंघ, येळंब’ यांचा सक्रिय सहभाग. गावातील महिलांनी एकत्र येऊन या सप्ताहाच्या नियोजनात मोलाचा वाटा उचलला आहे. यामध्ये:
* कामिनी काळदाते, विद्या पवार, वैशाली पवार, उषा गलांडे, आशा गलांडे.
* अलका पाटील, शकुंतला बोधले, लता कदम, सुषमा काळदाते, शितल काळदाते.
* जयश्री मोरे, पल्लवी काळदाते, सविता पाटील, वर्षा पाटील, सुनिता काळदाते.
* ननोबी शेख, लजिना शेख, सुप्रिया पाटील, अनिता पाटील.
यांसह समस्त महिला ग्रामसंघाच्या सदस्यांनी सप्ताहाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले आहेत.
सप्ताहामध्ये नामवंत कीर्तनकारांची सेवा लाभली आहे. यामध्ये ह.भ.प. श्री. शाडू महाराज आंधळे, ह.भ.प. श्री. दत्ता महाराज आंबेकर, ह.भ.प. श्री. लक्ष्मण लांडे महाराज, ह.भ.प. श्री. गजेंद्र महाराज लिख्खे (खेर्डा), ह.भ.प. श्री. आप्पा महाराज जावळे आणि ह.भ.प. श्री. ज्ञानेश्वर महाराज (येडशी) यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते.
सप्ताहाची सांगता रविवार, दि. २५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९ ते १२ या वेळेत ह.भ.प. श्री. ज्ञानेश्वर काकडे महाराज (हावरगाव) यांच्या काल्याच्या कीर्तनाने होईल. त्यानंतर ‘झाशीची राणी महिला ग्रामसंघ, येळंब’ यांच्या वतीने व समस्त ग्रामस्थांच्या वतीने भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
या सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन समस्त ग्रामस्थ येळंब आणि येळंब भजनी मंडळ यांच्या वतीने करण्यात आले आहे

























