वळसंग – जागतिक महिला दिनानिमित्त वळसंग येथे भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन विजय क्लॉथ सेंटर व समर्थ क्लॉथ सेंटर यांच्यावतीने करण्यात आले होते
यामध्ये प्रथम क्रमांक अदिती नारायणकर,द्वितीय क्रमांक संगीता केशेट्टी ,तृतीय क्रमांक रेशमा धनशेट्टी,
उत्तेजनार्थ मनीषा मणुरे ,उत्तेजनार्थ प्राची कुर्ले यांनी मिळवला.विजय क्लॉथ सेंटर यांच्याकडून विजेत्यांचा बनारसी शालू, सिल्क साडी, सॉफ्ट सिल्क साडी, लेस साडी देऊन सन्मान करण्यात आला.या स्पर्धेसाठी प्रतिभा दुधगी, अजय माणकोजी यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. विजय क्लॉथ सेंटर मधील महिला कर्मचाऱ्यांनी स्पर्धा यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.






















