माढा : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामती जवळ विमान अपघातात मृत्यू झाल्याची बातमी कळताच संपूर्ण महाराष्ट्र सह देशभर हळहळ व्यक्त करण्यात आली अजित पवार यांचा मृत्यू हा महाराष्ट्राच्या राजकारण व समाजकारणासाठी न भरून येणारी पोकळी निर्माण करणारी घटना बुधवारी सकाळी ८.४५ दरम्यान घडली. माढा शहर व परिसराच्या वतीने माढा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात राजकारणातील सर्वपक्षीय तसेच सामाजिक क्षेत्र व्यापारी व्यावसायिक शेतकरी यांच्या वतीने अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. महाराष्ट्राचे दादा गेले दादा परत या म्हणत अनेकांनी भावुक भावना व्यक्त केल्या. यावेळी सर्व क्षेत्रात कार्यरत असलेले नागरिक उपस्थित होते.अनेकांना आपले अश्रू अनावर होऊन हळहळ व्यक्त होत होती.
यावेळी माजी आमदार धनाजीराव साठे नगराध्यक्षा अॅड मिनल साठे उपनगराध्यक्षा कल्पना जगदाळे, दादासाहेब साठे, शिवाजीराव सावंत,आनंदराव कानडे, पृथ्वीराज सावंत, ऋतुराज सावंत, गुरुराज कानडे, समर्थ भांगे, शंभुराजे चवरे, गणेश साठे, मुन्ना साठे, शंभू साठे, गंगाराम पवार, शहाजी चवरे, दिनेश जगदाळे,महेश चवरे,रवी सरवदे,देविदास खरात,किरण पवार, दत्तात्रय अंबुरे, संतोष जुगदार, माढा नगरपंचायतचे नगरसेवक नगरसेविका यांसह अनेक माढावासीय व परिसरातील गावचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माजी आमदार धनाजीराव साठे यांनी भावुक होऊन यावेळी आपले मनोगत व्यक्त करत सहअश्रू श्रद्धांजली वाहिली. अनेकांना आपल्या भावना व्यक्त करत हुंदका आवरता आला नाही.
अजितदादांच्या निधनाने महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यामुळे माढा शहर कडकडीत बंद ठेवून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.

























