बार्शी – येथील श्री वर्धमान जैन सार्वजनिक तालुका वाचनालयात शहीद दिनानिमित्त दि. २३ मार्च रोजी सकाळी भारतमातेचे थोर वीर सुपुत्र शहीद भगतसिंग, सुखदेव,राजगुरु यांच्या प्रतिमेचे पुजन व विनम्र अभिवादन वाचनालयाचे अध्यक्ष किशोर श्रीश्रीमाळ, ऑ.सेक्रेटरी आनंद पुनमिया, संचालक प्रमोद भंडारी यांचे हस्ते करण्यात आले.
यावेळी वाचनालयाचे वाचक वर्ग व सभासद उपस्थित होते. या सर्वांनी शहीद दिनानिमित्त शहीद भगतसिंग, सुखदेव, राजगुरु यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन संचालक प्रमोद भंडारी यांनी केले. वाचनालयाचे ग्रंथपाल सुरेश यादव, सहा.ग्रंथपाल सौ.शितल लुकडे, क्लार्क विराज पतंगे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.






















