सोलापूर – दि. 23 मार्च रोजी तुळतापुरवेस बलिदान चौक या ठिकाणी शहीद अशोक कामटे विचारमंच तर्फे भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी स्वःताच्या प्राणांची आहुती देणाऱ्या शहीद भगतसिंग,राजगुरू, सुखदेव यांच्या स्मरणार्थ देशभरात शहीद दिवस साजरा केला जातो. 23 मार्च रोजी इंग्रजांनी घटसिंग राजगुरू आणि सुखदेव या भारत मातीच्या वीर जवानांना फाशी दिली होती त्यांच्या या बलिदानामुळे भारतीय स्वातंत्र आणायला नवीन दिशा मिळाली त्यामुळे आजचा दिवस शहीद दिवस म्हणून साजरा केला जातो.
या प्रसंगी बलिदान चौक या ठिकाणी शहीद भगतसिंग, सुखदेव राजगुरू या विरांना स्मरण करून पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी शहीद अशोक कामटे विचारमंच मंचचे अध्यक्ष योगेश कुंदुर, आस्था सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आनंद तालिकोटी, MSEB चे अधिकारी विलास कोले, आस्था सामाजिक संस्थेचे प्रसिद्धी प्रमुख सुहास छंचुरे, दिपक उपळकर, व्यास, गिरीष विजापुरे, विकास कुंदुर, मुद्दसर तांबोळी, संतोष गायकवाड आदी उपस्थित होते.
























