धामणगाव रेल्वे तालुक्यात तळेगाव, देवगावसह परिसरातील काही गावात शनिवारी सायंकाळच्या सुमारास गारपिटीसह जोरदार बरसलेल्या अवकाळी पावसाने दाणादाण उडविली.
दीड महिन्यापूर्वी लागवड केलेले ५०० हेक्टर क्षेत्रातील हरभरा, गहु, कांदा या पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या संकटात आणखी भर पडली आहे.शनिवारी जिल्ह्यात सकाळ पासूनच ढगाळ वातावरण होते सायंकाळी आभाळ गडगडायला लागले व काही क्षणातच पावसाला सुरवात झाली यावेळी पावसासोबत प्रचंड गारपीट झाली असून यात 500 हेक्टर वरील कांदा,गहू व गव्हाचे नुकसान झाले काही ठिकाणी तर पिके जमीनदोस्त झाली आहेत.