तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई : राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१ ऑगस्टपर्यत मुंबईसह, कोकण मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीसह वादळी वाऱ्याची शक्यता राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून वर्तविण्यात आली आहे.
8,10 दिवस दडी मारलेल्या पावसाने गेल्या दोन दिवसापासून राज्यभरात पुन्हा जोर धरला आहे. कोकण व मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात काही ठिकाणी अतिवृष्टीसह अत्यंत अतिवृष्टी होण्याची शक्यता असूनमराठवाडा मध्ये काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता. वीज चमकणे, गडगडाट, वादळी वारे (40) 50 किमी/ताशी) यांची शक्यता आहे.कोकण किनारपट्टी: १६ ते २० ऑगस्ट दरम्यान ५०-६०किमी/ताशी वा-यासह समुद्रात खवळलेली स्थिती राहणार असून मच्छीमारांनी या कालावधीत समुद्रात जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
सचेत ॲपमार्फत नागरिकांना सूचना आपत्तीपासून सतर्क राहण्यासाठी सद्यस्थितीमध्ये नागरीकांना सचेत ॲपमार्फत अलर्ट संदेश पाठविले जात आहेत. आपत्तीच्या अनुषंगाने प्रशासनातर्फे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल यांना आपत्कालीन परिस्थिती करिता सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.
रायगड जिल्ह्यातील अंबा नदीने धोका पातळी तसेच कुंडलीका नदी व रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी आणि कोदवली नदीने इशारा पातळी ओलांडली असून याबाबत नागरिकांना सूचित करण्यात आले आहे. नागरिकांनी पूरस्थिती पासून सुरक्षित राहण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत सूचना देण्यात आल्या असून खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
मंत्रालयीन स्तरावरील राज्यस्तरीय आपत्कालीन कार्यकेंद्र २४x७ सुरू आहे. मंत्रालय नियंत्रण कक्षासाठी फोन नं. ०२२-२२०२७९९० किंवा ०२२-२२७९४२२९ किंवा ०२२-२२०२३०३९ तसेच मोबाईल – ९३२१५८७१४३ उपलब्ध करुन देण्यात आले असल्याचेही आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे.
Post Views: 4