सोलापूर – साखर पेठ येथील बाहुसार शिक्षण प्रसारक मंडळ संचलित हिंगुलांबिका प्राथमिक शाळेने समूहनृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला. नृत्य कलाकार श्री नागेश अलुर यांच्यामार्फत समूहनृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
सात रस्ता येथे उपलप मंगल कार्यालय येथे आयोजित समूहनृत्य स्पर्धेत एकूण ११ शाळांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत हिंगुलांबिका प्राथमिक शाळेने प्रथम क्रमांक पटकाविला. खूब लढी वो मर्दानी या झाशीच्या राणीवर आधारित अंगावर रोमांच उभे करणारे थीम सॉंग सादर करून हिंगुलांबिका प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी झाशीच्या राणीचा इतिहास उलगडून उपस्थितांची मने जिंकली.
या स्पर्धेसाठी श्री आश्विन संगवे, सौ माधवी खमितकर, सौ रेवती क्षीरसागर यांनी परिश्रम घेतले. बाहुसार शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बापू ढगे व सचिव श्री विजय पुकाळे यांनी अभिनंदन केले. हिंगलाज प्रीमियर लीगचे आशिष कटारे, दर्शन ढगे, प्रतीक पुकाळे, आनंद खामितकर, सूर्यकांत खमितकर, रामकृष्ण रंगदळ, नरेंद्र दंतकाळे व यश ढोले यांच्यावतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी विद्यानिकेतन हायस्कूलचे मुख्याध्यापक गोपी नवले, पर्यवेक्षक शंकरगिरी गिरी, सहशिक्षक नितीन मुसळे, प्राथमिकचे मुख्याध्यापक प्रमोद हंचाटे व सहशिक्षिका बीना बुगले यांची उपस्थिती होती.

























