सोलापुर – नुकतेच सोलापूर जिल्हा परिषद मराठा सेवा संघ यांच्या विद्यमाने राजमाता मासाहेब जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात महागायक विजेते तथा सोलापूर जिल्हा परिषद चे ब्रांड अम्बेस्डर मोहंम्मद अयाज यांचा सत्कार करण्यात आला.
मोहम्मद अयाज यांनी आपल्या सुरेल आवाजात जय जय महाराष्ट्र माझा हे राज्य गीत गाऊन स्वराज्य जनक छत्रपती शिवाजी महाराज व मा जिजाऊ यांना अभिवादन केले. सभागृहात बसलेल्या माय माऊलीसाठी तू कितनी अच्छी है ओ मा तू कितनी अच्छी है हे गीत गाऊन समस्त माय माऊलींना भारवून टाकले. यावेळेस मोहम्मद यांचा सोलापूर जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री कुलदीप जंगम यांच्या हस्ते मोहम्मद अयाज यांना मानपत्र शाल श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आला .
यावेळेस मंचावरती अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, प्रशासन विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील , उप मुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ , जिल्हा ग्रामीण विकास प्रकल्प संचालक राजशेखर जगताप, अमोल जाधव , मुख्य लेखा अधिकारी मीनाक्षी वाकडे, शिक्षणाधिकारी कादर शेख, कृषी विकास अधिकारी हरिदास हावळे , कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी, गटविकास अधिकारी मनोज राऊत व महाराष्ट्र मराठा सेवा संघाचे अध्यक्ष अविनाश गोडसे , सह अधिकारी वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते हा कार्यक्रम सोलापूर जिल्हा परिषद येथील यशवंतराव चव्हाण या सभागृहात पार पडला यावेळेस मोहम्मद अयाज ने समस्त सोलापूर जिल्हा परिषदेचा आभार व्यक्त केले.
———‐—————‐‐—————
फोटोमध्ये = जिल्हा परिषद सोलापूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री कुलदीप जंगम, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदिप कोहिनकर, संचालक प्रकल्प सोलापूर जिल्हा ग्रामीणचे अधिकारी राजशेखर जगताप, गायक मोहम्मद अयाज


























