धाराशिव – युवा पिढीने व्यसना पासून दूर राहून प्रगती कशी करावी या बाबत मार्गदर्शन नार्कोटिक ड्रग्सचे I. G. शारदा राऊत यांनी केले.
धाराशिव तालुक्यातील बावी आश्रमशाळा व विद्यालय येथे छ. सभाजी नगर आमली पद्धार्थ विरोधी टास्क फोर्स युनिट धाराशिव येथील पोलिसा मार्फत व्यसनमुक्ती बाबत मार्गदर्शन युवा पिढीने व्यसना पासून दूर राहून प्रगती कशी करावी या बाबत व गांजा, ड्रग्स पासून होणारे नुकसान या बाबत ची माहिती नार्कोटिक ड्रग्सचे I. G. श्रीमती शारदा राऊत यांनी दिली.
सदर कार्यक्रम हा नार्कोटिक ड्रग्सचे i. G. श्रीमती शारदा राऊत,नागपूर पोलीस अधीक्षक अजित टिके, पुणे पोलीस अधीक्षक खाटमोडे, छ. सभाजी नगर चे स. पोलीस निरीक्षक विजय जगदाळे, दिपाली पाटील यांचे मार्गदर्शनाखाली धाराशिव युनिट चे सहायक पोलीस उप-निरीक्षक वाहेद मुल्ला, गोपाळ पुरके, महिला हवालदार शैला टेळे, नागेश केंद्रे, निलेश सरफाळे व बावी महाविद्यालय चे शिक्षक /प्राद्यापक वर्ग, महाविद्यालयीन विद्यार्थी ची जास्तीत जास्त संख्या उपस्थित होते.
























