माळशिरस : श्रीनाथ विद्यालय ज्युनिअर कॉलेज, महात्मा फुले विद्यालय व चंदूकाका सराफ (अकलूज) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या स्पर्धेत मी अहिल्या होणार ग चा मान दिव्या चव्हाण यांना मिळाला असून त्यांना महेश क्लॉथ सेंटर यांच्याकडून पैठणी, मानाचा फेटा देवून सन्मानित करण्यात आले .
कार्यक्रमाची सुरुवात नगराध्यक्ष.प्राजक्ता ओहोळ उपनगराध्यक्ष अर्चना देशमुख नगरसेविका ताई वावरे यांच्या हस्ते विद्येची देवता सरस्वतीचे पूजन करून करण्यात आली.
मकर संक्रातचे औचित्य साधून विद्यालयात हळदी-कुंकूचा कार्यक्रम घेण्यात आला.यामध्ये वेगवेगळ्या स्पर्धा घेण्यात आल्या.यामध्ये प्रथम डोक्यावर पेला ठेवणे स्पर्धेत काजल मदने , बॉटल भरणे स्पर्धेत दिव्या चव्हाण , संगीत खूर्ची स्पर्धेत सुनिता चव्हाण यांनी प्रथम क्रमांक मिळविला तर लकी विजेता म्हणून वैष्णवी शिंदे यांच्या नावाची चिठ्ठी निघाली. त्यानंतर सर्व स्पर्धेतून प्रथम आलेल्या विजेत्यामधून प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली यामध्ये दिव्या चव्हाण यांना मी अहिल्या होणार चा मान मिळाला त्यांना महेश क्लॉथ सेंटर यांच्याकडून पैठणी, मानाचा फेटा देण्यात आला..तर द्वितीय व तृतीय क्रमांकाला सोन्याची नथ व चांदीची लक्ष्मीची प्रतिमा देवून सन्मानित करण्यात आले.तसेचउपस्थित सर्व महिलांना वाण म्हणून स्टील डबा भेट देण्यात आला.
या कार्यक्रमासाठी संस्थाध्यक्ष डॉ.श्री.आप्पासाहेब देशमुख, अनिरुद्ध शिंगाडे, रावसाहेब देशमुख, हमीद मुलाणी, माया पिंगळे, रुपाली वाघमोडे, पल्लवी वाघमोडे, ललिता पाटील, सुमन घाडगे, शोभा काळे, वर्षा गोरड, अन्नपूर्णा माने, कांचन बावळे, मुख्याध्यापक मधूकर गुंड, प्राचार्य योगेश गुजरे, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, परिसरातील महिला भगिनी उपस्थित होत्या
























