मोडनिंब – येथे बालाजी पाटील मित्र परिवाराकडून इफ्तार पार्टीचे आयोजन आमदार अभिजीत पाटील यांची उपस्थिती सामाजिक सलोखा आणि एकात्मतेसाठी तसेच समानतेची जाणीव निर्माण करून आपापसांतील बंधुभाव वाढवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे आमदार अभिजीत पाटील यांनी केले.
मोडनिंब (ता. माढा) येथे बालाजी पाटील मित्र परिवार यांच्या वतीने रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले. या इफ्तार पार्टीत हिंदू-मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सामाजिक एकात्मतेचा संदेश दिला.
सर्वांनी एकत्रितपणे इफ्तार करून सामाजिक ऐक्याचा संदेश दिला.यावेळी आमदार पाटील यांनी महिला दिन व रंगपंचमीच्याही शुभेच्छा दिल्या.पाटील परिवाराकडून गेल्या वीस वर्षापासून बंधुभाव वाढवण्यासाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात येत आहे.
या कार्यक्रमामुळे समाजातील परस्पर संबंध अधिक दृढ होत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.यावेळी माजी सभापती भारत शिंदे, ग्रामपंचायत सदस्य बालाजी पाटील, डॉ. संतोष दळवी, बाबूराव सुर्वे, कुरण गिड्डे, नागनाथ ओहोळ, शिवाजी सुर्वे,दत्तात्रय सुर्वे,फिरोज तांबोळी, नूरभाई तांबोळी, सलमान तांबोळी,तनवीर शेख यासह समाजबांधव आदी उपस्थित होते.


















