*तालुका कॉंग्रेस कमिटी भोकरदन,जाफराबाद ची दि ९ जुलै रोजी महत्त्वाची बैठक*
जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुका काँग्रेस कमिटी सर्व आजी-माजी पक्ष पदाधिकारी कार्यकर्ते यांची महत्त्वाची बैठक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मा श्री राजाभाऊ देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक ९ जुलै २४ मंगळवार रोजी सकाळी ११ वाजता होंडा शोरूम खाली,भारत पेट्रोल पंप शेजारी सिल्लोड रोड, भोकरदन येथे
व जाफराबाद तालुका कॉंग्रेस कमिटीची बैठक दुपारी २ वा कृषी उत्पन्न बाजार समिती,मधील नवजीवन कृषी केंद्राशेजारील गाळा क्र.१३ जाफराबाद मध्ये आयोजित करण्यात आली असून या बैठकीमध्ये आगामी विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणूक तयारी आढावा आणि केंद्रीय निवडणूक आयोगाने दि २५ जुन ते २४ जुलै दरम्यान मतदार यादी पुनरिक्षण व वय वर्ष १८ वर्ष पूर्ण करणार्या नवमतदाची नोंदी करण्यासाठी प्रत्येक गावात,शहरात नोंदी करणे चालु असलेल्यांचा आढावा या अशा विविध विषयांवर सविस्तर चर्चा होणार असून याला दोन्ही ही तालुक्यातील काँग्रेस पक्षाच्या आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन भोकरदन तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष पाबळे व जाफराबाद ता अध्यक्ष ज्ञानेश्वर शिंदे यांनी केले आहे
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

























