जुळे सोलापूर भागातील कल्याण नगर येथे मोठ्या पावसाचे पाणी घरामध्ये शिरून अनेक नागरिकांना आर्थिक व मानसिक त्रास होत आहे गेल्या दहा वर्षापासून जुळे सोलापूर भागातील कल्याण नगर या सखल भागांमध्ये अनेक नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी जाऊन संसार उपयोगी साहित्याचे नुकसान होत आहे.
त्यामुळे संभाजी ब्रिगेडच्या वतीने वारंवार या भागाचे लोकप्रतिनिधी सुभाष देशमुख यांना निवेदन देऊन सुद्धा या लोकप्रतिनिधींनी या भागाकडे दुर्लक्ष केलेले आहे लोकप्रतिनिधी सुभाष देशमुख यांनी गेल्या दहा वर्षापासून हा प्रश्न सोडविला तर नाहीच पण या आपत्तीमुळे नागरिकांना भेट सुद्धा दिली नाही असंवेदनशील लोकप्रतिनिधीचा जाहीर धिक्कार येथील नागरिकांनी केलेला आहे