सोलापूर – नवनियुक्त प्राथमिक शिक्षकांचे सेवांतर्गत प्रशिक्षण दिवाळी सुट्टीत न घेता दिवाळी सुट्टीनंतर घ्यावे तसेच ज्या शिक्षकांचे प्रशिक्षण झाले आहेत त्यांना पुन्हा प्रशिक्षण देण्यात येऊ नये अशी मागणी शिक्षक सहकार संघटनेच्या वतीने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्यातील नविन नियुक्त शिक्षक नोकरी निमित्ताने विविध जिल्ह्यात कार्यरत आहेत. हे शिक्षक दिवाळी सुट्टीत आपल्या मूळ गावी जात असतात. पण दिवाळी सुट्टीच्या कालावधीत नव नियुक्त शिक्षकांचे सेवांतर्गत प्रशिक्षण आयोजित केले आहे. त्या मुळे त्याना आपल्या कुटुंबासह दिवाळी साजरी करता येणार नाही. म्हणून दिवाळी सुट्टीनंतर प्रशिक्षण आयोजित करण्यात यावे.
तसेच अनेक शिक्षक हे गेल्या वर्षी प्राथमिक शिक्षक म्हणून नोकरीस लागले होते . त्या वेळी त्यांचे सदर प्रशिक्षण झाले होते. यंदा मात्र ते माध्यमिक शिक्षक म्हणून नोकरीस लागले असल्याने त्यांची सेवा ग्राह्य धरण्यात आली आहे. इयत्ता पहीली ते बारावी पर्यंतच्या सर्व शिक्षकांना एकसारखे अभ्यासक्रमवार आधारित प्रशिक्षण दिले जाते. म्हणून प्रशिक्षण झालेल्या शिक्षकांना पुन्हा प्रशिक्षण देण्यात येवू नये अशी मागणी मागणी संचालक रेखावार यांच्याकडे करण्यात आली आहे. यावेळी शिक्षक सहकार संघटनेचे राज्याध्यक्ष संतोष पिट्टलवाड, राज्य सरचिटणीस निलेश देशमुख, महिला आघाडीच्या अध्यक्षा शुभांगी चौधरी, राज्य कार्याध्यक्ष दिपक परचंडे, प्रसिद्धीप्रमुख गजानन देवकत्ते, राज्य विभागीय अध्यक्ष रविंद्र अंबुले उपस्थित होते .


















