नविन नांदेड – नांदेड जिल्हा नियोजन विकास मंडळाच्या निधीतून जिल्हा परिषद नांदेड अंतर्गत असलेल्या विष्णुपुरी पशु वैद्यकीय दवाखाना इमारत लोकार्पण सोहळा दिनांक २६ जानेवारी २०२६ रोजी डॉ.संतबाबा हरजिदरसिंघ व राजेजी रामा गयानोजी ठाकूर व सरपंच सौ.संध्या विलास हंबर्डे व ऊपसरपंच सौ. अर्चना विश्वनाथ हंबर्डे ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत
पार पडला.
जिल्हा नियोजन विकास कार्यक्रम अंतर्गत विष्णुपुरी येथील पशुवैद्यकीय दवाखाना इमारत पाच खोल्यांचे बांधकाम असलेली इमारत ही ११ गावातील पशुधनाचा उपचार व संगोपनासाठी असून या इमारतीच्या लोकार्पण सोहळा डॉ.संतबाबा हरजिदरसिंघ दिनांक २६ जानेवारी रोजी संपन्न झाला, यावेळी ध्वजारोहण सरपंच सौ.संध्या विलास हंबर्डे व ऊपसरपंच अर्चना विश्वनाथ हंबर्डे यांच्या हस्ते करण्यात आले तर उपस्थितांचे स्वागत पशुधन वैद्यकीय अधिकारी राजेश्री जाधव यांनी केले.
यावेळी सरपंच प्रतिनिधी राजु हंबर्डे, ऊपसरपंच विश्वनाथ हंबर्डे, सोमभारती महाराज, सेवानिवृत्त उपनिरीक्षक माणिकराव हंबर्डे, विश्वनाथ हंबर्डे,लक्ष्मण ठाकूर,प्रकाश हंबर्डे,माजी सरपंच संतोष बारसे, माजी सरपंच जनाबाई शेबोले, मुख्याध्यापिका उज्ज्वला जाधव, भगवान सोळंके,चांदु वाहुळकर, संतोष हंबर्डे, माधवराव हंबर्डे,राजु हंबर्डे ,बालाजी हंबर्डे,विलास भोसले, नारायण कांबळे,नारायण हंबर्डे,अमृतराव हंबर्डे ,पोलीस पाटील प्रविण हंबर्डे, ग्रामपंचायत अधिकारी संजय कानोडे यांच्या सहग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवीन झालेल्या इमारती मुळे पशुवैद्यकीय दवाखाना अंतर्गत जवळपास अकरा गावातील ग्रामस्थांचा पशुधनावर उपचार व संगोपनासाठी मदत होणार आहे.

























