सोलापूर – श्री चतुरबाई श्राविका प्राथमिक विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी आज वार्षिक क्रीडा सप्ताहाचे शानदार उद्घाटन अत्यंत उत्साही वातावरणात पार पडले.
नियोजनबद्ध अशा या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मा.श्री मल्हारी माने प्रशासनाधिकारी म.न.पा प्राथमिक शिक्षण मंडळ सोलापूर व मा. श्री सुरेश वाघमारे उपशिक्षणाधिकारी जि. प.माध्य. सोलापूर तसेच मा. श्री नागेश येळ्ळे सर पोलिस उपनिरीक्षक श्री. भोसले पोलीस उपनिरीक्षक सम्राट चौक आणि पोलिस अंमलदार अनिता मोरे मॅडम हे उपस्थित होते. संस्थेचे विश्वस्त देवई शहा मॅडम मुख्याध्यापिका देशमाने मॅडम बालमंदिर विभाग मुख्याध्यापिका सौ काटकर मॅडम शालेय व्यवस्थापन समिती सदस्य उपस्थित होते.
प्रथम इयत्ता चौथीच्या विद्यार्थिनींनी औक्षण करून व सुंदर स्वागत गीताने व नृत्याने पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन क्रीडा साहित्य पूजन व मशाल पेटवून करण्यात आली यानंतर विद्यार्थ्यांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने संचलन केले आणि पाहुण्यांना सलामी दिली. शाळेच्या क्रीडांगणावर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते फुगे सोडण्यात आले .
या उद्घाटन सोहळ्यामध्ये विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कार देशभक्ती नृत्य मानवी मनोरे लेझीम सादरीकरण केले.
विद्यार्थ्यांचे सादरीकरण पाहून प्रशासनाधिकारी मल्हारी माने साहेबांनी विद्यार्थी सर्वांगिण विकासाचे असे उपक्रम प्रत्येक शाळेने राबवले पाहिजे हे बोलून शाळेच्या विविध उपक्रमांचे कौतुक केले. तसेच रिबीन कवायत ,पिंगपाँग कवायत, कमळ फुल कवायत, बांबू कवायत ,डंबेल्स कवायत, बॉल कवायत ,रिंग कवायत ,अम्ब्रेला कवायत व घुंगुरकाटी कवायत अशा विविध ससाहित्य संगीतकवायत प्रकार सादर केले. ज्यांना उपस्थितांनी व पाहुण्यांनी जोरदार दाद दिली.
























