तभा फ्लॅश न्यूज/ नवी दिल्ली : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ मधून पाकिस्तानला सडेतोड प्रत्युत्तर दिले असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत भाषणाद्वारे दिली. भारत आता दहशतवाद सहन करत नाही, तर त्याचा बंदोबस्त करतो, अशा शब्दांत त्यांनी पाकिस्तानला कडक उत्तर देत फटकारले.
भारतात 22 एप्रिलला हल्ला सूड 22 मिनिटांत!
पहलगाममधील हल्ल्यास उत्तर देत भारतीय सैन्याने २२ मिनिटांत ही कारवाई केली. दहशतवाद्यांना त्यांच्या ठिकाणी जाऊन उद्वस्त केले. ही केवळ कारवाई नव्हे, तर देशाच्या सन्मानाची लढाई होती, असं मोदींनी आपल्या भाषणात सांगितले.
भारतीय सौन्याला दिली मोकळीक, पाकिस्तान थरथरला
पंतप्रधान मोदी म्हणाले, “सैन्याला सर्व अधिकार दिले. कुठे, कधी आणि कसा हल्ला करायचा हे त्यांनीच ठरवायचं आणि मग जे केलं, त्याने पाकिस्तानची झोप उडवली. आजपर्यंत दहशतवादी सुरक्षित राहत होते. पण आता परिस्थिती बदलली आहे. भारत थांबत नाही, घुसतो आणि संपवतो.
पुढे बोलताना ते म्हणाले, ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या एअरबेसना असे हादरे दिले की ते भारतावर हल्ले करताना विचार करतील. तसेच, पाकिस्तानकडून वारंवार दिल्या जाणाऱ्या न्यूक्लिअर धमक्यांना भारताने भीक घातली नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
हल्ले थांबवा पाकिस्तानचा फोन…
2 मेच्या मध्यरात्रीपासून 10 मेच्या पहाटेपर्यंत भारतीय सैन्याने पाकिस्तानमध्ये घुसून जोरदार कारवाई केली. पाकिस्तानला असा हल्ला अपेक्षितच नव्हता. त्यामुळे त्यांनी गुडघे टेकले. DGMO ला थेट फोन करून भारताला विनंती केली. अशी माहिती पंतप्रधान मोदी यांनी दिली.