Wednesday, March 18, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

श्री विठ्ठल–रूक्मिणी मंदिर जतन व संवर्धन कामांची पाहणी

तरुण भारतbyतरुण भारत
January 1, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
7
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पंढरपूर – श्री विठ्ठल–रूक्मिणी मंदिर व पंढरपूर शहरातील परिवार देवतांच्या मंदिरांचे जतन, संवर्धन व जिर्णोद्धाराची कामे शासन निधीतून पुरातत्व विभागामार्फत दि. १६ डिसेंबर २०२३ पासून सुरू करण्यात आली आहेत. सदर आराखड्यातील पहिल्या टप्प्यातील विठ्ठल गाभारा, रूक्मिणी गाभारा, बाजीराव पडसाळी तसेच विठ्ठल सभामंडप येथील कामे पूर्णत्वास आली असून उर्वरित कामे प्रगतीपथावर आहेत.

आराखड्यातील सर्व कामे गुणवत्तापूर्ण व विहित कालावधीत पूर्ण करण्याच्या दृष्टीने दिनांक ३० डिसेंबर रोजी मंदिर समिती, पुरातत्व विभाग व ठेकेदार यांच्या समवेत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या अनुषंगाने मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या समवेत सुरू असलेल्या व प्रस्तावित कामांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.
यावेळी कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, प्रभारी व्यवस्थापक संदेश भोसले, लेखा अधिकारी मुकेश अनेचा, विभाग प्रमुख पृथ्वीराज राऊत, संजय कोकीळ, बलभिम पावले, वास्तुविशारद श्रीमती तेजस्विनी आफळे तसेच संबंधित ठेकेदारांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरातील व परिसरातील परिवार देवतांच्या पूर्णत्वास आलेल्या मंदिरांची उर्वरित कामे तातडीने पूर्ण करून भाविकांना दर्शनासाठी लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याबाबत यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच पंढरपूर शहर व परिसरातील सर्व परिवार देवतांच्या मंदिरांचे जतन व संवर्धनाची कामे नियोजित पद्धतीने करण्याबाबत ठेकेदारांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या.
——————–

व्यंकटेश मंदिराच्या कामाचा घेतला आढावा
बाजीराव पडसाळी येथील श्री व्यंकटेश मंदिराच्या कामाचाही आढावा घेण्यात आला असून सदर मंदिराचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती देण्यात आली. यासोबतच जतन व संवर्धनाच्या कामांसाठी आवश्यक ते मनुष्यबळ वाढवून कामांचा वेग वाढविण्याच्या सूचना ठेकेदारांना देण्यात आल्या.
————————–
पावसाळ्यापूर्वी वॉटरप्रुफिंगची कामे पूर्ण करण्याच्या सूचना
पावसाळ्यापूर्वी सर्व वॉटरप्रुफिंगची कामे पूर्ण करण्याबाबत विशेष दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मंदिर जतन व संवर्धनाची सर्व कामे वेळेत व गुणवत्तापूर्ण पूर्ण करण्याबाबत पुरातत्व विभागास सूचित करण्यात आले असून, सर्व कामांचा लवकरच विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आढावा घेतला जाणार आहे.

Post Views: 454
Previous Post

श्रीकमलादेवी मंदिर जतन व संवर्धनाच्या कामास लोणावळा येथील परिवाराकडून देणगी अर्पण

Next Post

अधिकृत उमेदवारी नसलेल्यांनी माघार घ्यावी ; अन्यथा शिस्तभंगाची कारवाई करावी लागेल

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

अधिकृत उमेदवारी नसलेल्यांनी माघार घ्यावी ; अन्यथा शिस्तभंगाची कारवाई करावी लागेल

ताज्या बातम्या

मंठा पोलीस निरीक्षक पदावर पदावर पुरुषोत्तम देशमुख यांची नियुक्ती केली आहे

March 18, 2026

बदनापूर तालुक्यात भेसळयुक्त दुधाचा संशय; खाजगी डेऱ्यांवर गंभीर आरोप

March 18, 2026

शरदचंद्र पवार प्रशाला व ज्यु. कॉलेजच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना २०० सायकल वाटप

March 18, 2026

18 March 2026

March 18, 2026

हिंदवी सेना महाराष्ट्र राज्य सोलापूर श्रीराम नवमी उत्सव २०२६ पदाधिकारी निवड बैठक संपन्न

March 18, 2026

हिंदवी सेना महाराष्ट्र राज्य सोलापूर श्रीराम नवमी उत्सव २०२६ पदाधिकारी निवड बैठक संपन्न

March 18, 2026

सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी दीपक वैद्य तर उपाध्यक्ष पदी इंद्रजीत पवार बिनविरोध निवड

March 18, 2026

भूगोल पेपर चोरी प्रकरणात चार निलंबित, उद्याचा पेपर नियोजित वेळेस होणार

March 18, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0745832

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697