सांगोला – जागतिक महिला दिनानिमित्त सांगोला महाविद्यालयामध्ये अंतर्गत गुणवत्ताहमी कक्ष समन्वयक डॉ.रामचंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली.
याप्रसंगी मनोगतात सह्याद्री इंग्लिश मिडीयम स्कूल, सांगोलच्या संस्थापिका सुवर्णा इंगवले यांनी महिला शिक्षण, स्वावलंबन आणि आत्मविश्वासाच्या बळावर समाजात मोठे योगदान देऊ शकते असे सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्र.प्राचार्य डॉ.सुरेश भोसले, प्रा.निकिता लामगुंडे, रेवा ताटे, प्रगती शिंदे, ऋतुजा नाडगे यांनी महिला सशक्तीकरण, शिक्षणाचे महत्त्व आणि समाजातील स्त्रियांची भूमिका याबाबत मनोगत व्यक्त केले.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.सोनल भुंजे, सूत्रसंचालन डॉ. भाग्यश्री पाटील यांनी केले. आभार प्रा.डॉ.चित्रा जांभळे यांनी मानले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापिका, कर्मचारी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.























