Wednesday, March 11, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

जिल्हा परिषद पंचायत निवडणुकीसाठी परिचारक आणि भालके दोन्ही गटाकडून इच्छुकांच्या मुलाखती सुरू

तरुण भारतbyतरुण भारत
January 20, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
6
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पंढरपूर – जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. निवडणुकीची तयारी सर्वच नेत्यांनी सुरू केली असल्याचे दिसून येत आहे. परिचारकांच्या नेतृत्वाखालील भाजप कडून तर विरोधी भालकेंकडून निवडणूकीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे या निवडणूकांसाठी उमेदवारी कोणास मिळणार याकडे तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

महापालिका निवडणुकीमध्ये भाजपला चांगले यश मिळाले आहे. त्यानंतर मिनीविधानसभा समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीकडे आता भाजपने पूर्ण ताकदीने लक्ष केंद्रित केले आहे.  भाजपाच्या विजयी घौडदौडीमुळे पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकत्यां मध्ये देखील उत्साह निर्माण झाला आहे.


दरम्यान पंढरपूर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती मध्ये निवडणूक लढू इच्छिणाऱ्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती शहरातील टिळक स्मारक मंदिर येथील भाजपाच्या कार्यालयात घेण्यात आल्या. यावेळेस अनेक जण इच्छुक असल्याचे दिसून आले. इच्छुकांच्या मुलाखती जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, माजी आमदार प्रशांत परिचारक, युवा नेते प्रणव परिचारक यांनी घेतल्या. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. पाच ते सहा वर्षानंतर या निवडणूका होत असल्यामुळे निवडणूक लढविणाऱ्यांची संख्या जास्त असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षांच्या पदाधिकारी तसेच नेते मंडळींकडून गावागावात बैठका घेऊन कोणाला उमेदवारी द्यावयाची याबाबतची चाचपणी देखील करण्यात आली आहे.


गेल्या पंचवीस वर्षापासून पंढरपूर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीवर परिचारक गटाचे वर्चस्व आहे. मात्र सध्या  नेत्यांच्या  गटा पेक्षा भाजपासहित इतर राजकीय पक्षांकडून आपआपल्या पक्षांवर निवडणुकां लढविण्यावर प्राधान्य दिले जात आहे. नगरपालिका तसेच महापालिकांच्या निवडणूकी प्रमाणे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये भाजप लक्ष घालणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले असल्याचे दिसून येत आहे.


गेल्या अनेक वर्षापासून पंढरपूर तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक विठ्ठल परिवार विरुद्ध पांडुरंग परिवार असा सामना झालेला आहे. मात्र यंदाच्या निवडणुका भाजप,  शिवसेना,  काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून लढविल्या जाणार असल्याचे दिसून येत आहे. एकंदरीत पंढरपूर तालुक्यांमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची तयारी जोरदार सुरू असल्याचे दिसून येत आहे. यामुळे कोणाला उमेदवारी मिळणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
————————-

भालके यांच्या बंगल्यावर इच्छुकांची मोठी गर्दी
अनेकांनी दिल्या मुलाखती )
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भालके गटाची बैठक भगीरथ भालके यांच्या बंगल्यावर रविवारी घेण्यात आली बैठकीस मोठ्या प्रमाणात पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. अनेक इच्छुक उमेदवारांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक लढविण्यासाठी मुलाखती दिल्या  आहेत. 
पंढरपूर शहर व तालुक्यात भालके गटाला मोठा मानणारा वर्ग आहे यामुळे नुकत्याच झालेल्या पंढरपूर नगरपरिषद निवडणुकीमध्ये भालके गटाला चांगले यश मिळाले आहे.  त्यामुळे भालके गटातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा उत्साह वाढला असून त्यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली असल्याचे दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर रविवारी भालके यांच्या पंढरपूर येथील बंगल्यावर इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या यावेळी मोठ्या प्रमाणात भालके गटातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. तालुक्यातील अनेक जण भालके गटाकडून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचे विठ्ठल कारखान्याचे माजी अध्यक्ष भगीरथ भालके यांना सांगितले. एकंदरीतच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची तयारी भालके गटाने देखील जय्यतपणे सुरू केली असल्याचे दिसून येत आहे .

Post Views: 21
Previous Post

राष्ट्रवादीला रामराम करत उद्योजक उदय मानेंचा भाजपात प्रवेश

Next Post

शहराच्या विकासासाठी संवाद महत्त्वाचा : प्रा. शोभाताई काळुंगे

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

शहराच्या विकासासाठी संवाद महत्त्वाचा : प्रा. शोभाताई काळुंगे

ताज्या बातम्या

शॉकसर्किटने आग; लाखांचे नुकसान 

शॉकसर्किटने आग; लाखांचे नुकसान 

March 11, 2026
डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या अध्यक्षपदी विकास कस्तुरे

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या अध्यक्षपदी विकास कस्तुरे

March 11, 2026
20 एमएलडी क्षमतेच्या मल निसारण केंद्राची उभारणी अंतिम टप्प्यात

20 एमएलडी क्षमतेच्या मल निसारण केंद्राची उभारणी अंतिम टप्प्यात

March 11, 2026
मार्कंडेय प्रशालेत महिला दिन व वार्षिक पारितोषिक वितरण  थाटात संपन्न

मार्कंडेय प्रशालेत महिला दिन व वार्षिक पारितोषिक वितरण  थाटात संपन्न

March 11, 2026
बुद्धिबळ स्पर्धा : सोलापूरचा सौरव साहू व रत्नागिरीची मयुरी तावडे विजेते

बुद्धिबळ स्पर्धा : सोलापूरचा सौरव साहू व रत्नागिरीची मयुरी तावडे विजेते

March 11, 2026

अबब ! उन्हाचा पारा वाढला.. #hightemperature #temperature #viral #tranding #popular

March 11, 2026

मनपाच्या महिला महोत्सवात ४० बचत गटांचा सहभाग. #public #marathinews #viral

March 11, 2026

दादांच्या आठवणीने वाहिले सुनेत्रा पवारांच्या डोळ्यातून अश्रू. #public #marathinews #solapurnews

March 10, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0724145

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697