महिला सन्मान बचत प्रमाणपत्र : महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेमध्ये कोणत्याही वयोगटातील महिला गुंतवणूक करू शकतात. अल्पवयीन मुलींना या योजनेत पैसे गुंतवायचे असतील तर तिचे पालक खाते उघडू शकतात.
ही एक ठेव योजना आहे ज्यामध्ये 7.5 टक्के दराने व्याज दिले जाते. या योजनेत जास्तीत जास्त 2 लाख रुपये गुंतवले जाऊ शकतात. ही योजना दोन वर्षांनी मॅच्युअर होते. जर तुम्ही या योजनेत 2 लाख गुंतवले तर तुम्हाला दोन वर्षांनी 2 लाख 32 हजार 044 रुपये मिळू शकतात.
पब्लिक प्रोविडंट फंड : पब्लिक प्रोविडंट फंड ही एक अशी योजना आहे ज्यामध्ये कोणताही भारतीय नागरिक गुंतवणूक करू शकतो. जर तुमची मुलगी अल्पवयीन असेल तर पालक तिच्या नावाने या योजनेत गुंतवणूक करू शकतात. या योजनेत 7.1 टक्के दराने व्याज मिळते.
या योजनेत वर्षाला जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये गुंतवले जाऊ शकतात. ही योजना 15 वर्षांनी मॅच्युअर होते. तुम्ही ही योजना 5 वर्षांच्या ब्लॉकमध्ये आणखी वाढवू शकता. या योजनेत तुम्ही तुमच्या मुलीच्या नावावर वार्षिक 1.5 लाख गुंतवल्यास, 15 वर्षांनंतर त्याचे 40 लाख 68 हजार 209 रुपये मिळतील.