जाफराबाद शहरातील हिंदू स्मशानभूमी बनली नगरपंचायत चे डम्पिंग ग्राउंड…
हिंदू स्मशानभूमीच्या बाजूला घाणच घाण नगरपंचायत प्रशासनाची दुर्लक्ष…
अंत्यविधी करताना नागरिकांना सोसावा लागतोय उग्र वासाचा त्रास…
जाफराबाद/प्रतिनिधी
जाफराबाद शहरातील हिंदु स्मशान भूमी येथे कुठल्याच सोयी सुविधा नसल्याने नगर पंचायत प्रशासन व नगरसेवक यांनी प्रत्येक वेळी निवडणुकीच्या वेळी हिंदु स्मशान भूमीचा कायापालट करू असे आश्वासन दिले आहे मात्र नगर पंचायत अस्तित्वात येवून 10 वर्ष होत आली मात्र या ठिकाणी आजपर्यंत एक रुपया सुद्धा खर्च केला नसून याउलट हिंदूंना अंत्यविधी करताना त्रास वाव्हा म्हणून की काय नगर पंचायत ने हिंदु स्मशानभूमीच्या बाजूलाच डम्पिंग ग्राउंड केले आहे या ठिकाणी दररोज हजारो टन कचरा आणून टाकला जातो आणि त्या कचऱ्यातून उग्र वास येऊन अंत्यविधीसाठी आलेल्या नागरिकांच्या जिवित्वस धोका निर्माण झाला आहे. या हिंदु स्मशानभूमीत भोई,मराठा,ब्राम्हण,तेली,धोबी,माळी, न्हावी,मारवाडी,कासार,सोनार, व इतर काही समाज बांधव अंत्यविधी करतात.
तरी येत्या 10 दिवसात नगरपंचायतीने हिंदु स्मशान भूमीचा बाजूला असलेला कचरा हटवला नाही तर नगरपंचायत समोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा सकल हिंदु बांधवांनी दिला आहे …