छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य संचालनालय व जिल्हा प्रशासनाच्या वतीने शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यावर आधारीत ‘जाणता राजा’ या महानाट्याचे २९ ते ३१ जानेवारी दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. या महानाट्यात जवळपास २०० कलावंतांचा सहभाग राहणार आहे.
तीन दिवशीय महानाट्याचे उद्घाटन २९ जानेवारी रोजी सायंकाळी ५.३० समता मैदान येथे होईल. शिवप्रेमी नागरिकांनी या महानाट्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.