सोलापूर : महापालिका निवडणुकीत प्रभाग 22 ड मधून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार रमेश सुतकर यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. त्यांचा झंजावाती प्रचार सुरू आहे. होम टू होम प्रचारावर भर दिला जात आहे. विविध ठिकाणी महिला भगिनींकडून औक्षण करून स्वागत केले जात आहे. शिक्षण क्षेत्रातील मानदंड असलेले विकासाभिमुख नेतृत्व असलेले रमेश सुतकर यांना या निवडणुकीत विजयी करण्याचा निर्धार आणि विश्वास नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने रमेश सुतकर हे या प्रभाग आणि शहर विकासासाठी निवडणुकीत उभे आहेत. याच प्रभागातून त्यांच्याबरोबर 22 अ मधून कीर्तीपाल घोडकुंबे,22 क मधून सुषमा फडतरे तर 22 ड मधून रमेश सुतकर हे निवडणूक रिंगणात आहेत. रमेश सुतकर हे याच प्रभागातील स्थानिक नेतृत्व आहेत. बाल वर्ग ते 12 वी पर्यंतचे त्यांचे कनिष्ठ महाविद्यालय आहे. गेल्या 42 वर्षापासून ते शैक्षणिक आणि सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. या परिसरातील घराघरापर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचविण्यासाठी त्यांनी यशस्वी प्रयत्न केले. शिक्षणाद्वारे अनेक पिढ्या घडविल्यानंतर आता एक विकसित शहर आणि प्रभाग घडविण्याचा त्यांनी संकल्प केला आहे.
त्यांनी या प्रभागात प्रचारात आघाडी घेतली आहे. होम टू होम प्रचारावर भर दिला आहे. प्रत्येक ठिकाणी त्यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले. सुशिक्षित, शिक्षणाद्वारे अनेक पिढ्या घडविणारा उमेदवार लाभल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे. त्यांना निवडून देण्याचा निर्धार महिला व नागरिकांमधून व्यक्त होत आहे. वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी त्यांच्या प्रचारार्थ नागरिकांशी संवाद साधला. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन युवा नेते सुजात आंबेडकर यांनी केले.
























