सोलापूर – मराठा सेवा संघ जिल्हा परिषद शाखेच्या वतीने राजमाता जिजाऊ जयंती निमित्त जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात मुख्य कार्यकारी कुलदीप जंगम यांचे शुभहस्ते व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, प्रकल्प संचालक चंद्रशेखर जगताप, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुर्यकांत भुजबळ, अमोल जाधव, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मिनाक्षी वाकडे, शिक्षणाधिकारी कादर शेख, कृषी विकास अधिकारी हरिदास हावळे, कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी, संतोष कुलकर्णी, एच. सी सपताळे गटविकास अधिकारी मनोज राऊत,विवेक जमदाडे, रघुनाथ पांढरे, उमेश कुलकर्णी,जस्मीन शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत व सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे विशेष उपस्थितीत जिल्हा परिषदेत खाते प्रमुख व गट विकास अधिकारी यांच्या आईचा कर्तृत्ववान महिला म्हणून सन्मान करण्यांत आला.तसेच यावेळी जिल्हा परिषदेतील सर्व जिजाऊ, सावित्रीलेकींचा मानाचा फेटा बांधून सन्मान करण्यात आला. होते. प्रारंभी जिजाऊ मॉंसाहेब व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुजन करून अभिवादन करण्यात आले. जिजाऊ वंदना अश्विनी भोसले यांनी तर राज्यगीत मोहंमद अयाज यांनी गायले. यावेळी मालती नंदकुमार कोहिणकर, उषा उत्तमराव जगताप, छाया महादेव पाटील, वनमाला महादेव भुजबळ, माया चंद्रहार जाधव, मंगला यशवंत मिरकले, कल्पना तानाजी वाकडे, सुदामती नागनाथ जगताप, प्रभावती गोविंद नवले, नंदाबाई शिवाजी हावळे, कलावती भरत धनशेट्टी,बायडाबाई सुभाष कवितके, सविता तानाजी कदम, वनिता विजय जमदाडे,चंद्रभागा भगवान पांढरे, कुसूम जनार्दन कुलकर्णी,लियाकत नैनुद्दीन शेख, सुनिता बापूराव राऊत यांचा सन्मान करण्यात आला.
राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त यशवंतराव चव्हाण सभागृहात दिवसभर रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते
६६ रक्तदात्यांनी उत्साहाने रक्तदान केले.
कार्यकमाचे प्रास्ताविक मराठा सेवा संघाच्या जिल्हा परिषद शाखेचे अध्यक्ष अविनाश गोडसे यांनी केले.
यावेळी शिक्षक संघटनेचे नेते अनिरुद्ध पवार,निलेश देशमुख,राम शिंदे,सुनिल चव्हाण, शामराव पाटील व कर्मचारी संघटनेचे नेते अरूण क्षीरसागर, राजेश देशपांडे, दिनेश बनसोडे, संतोष जाधव यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सचिन साळुंखे, सुर्यकांत मोहिते, सचिन चव्हाण, चेतन भोसले, आनंद साठे, विकास भांगे, रणजित गव्हाणे, संतोष शिंदे, अनिल पाटील, वासुदेव घाडगे, सुधाकर माने- देशमुख, विशाल घोगरे, अभिजीत निचळ, संतोष सातपुते, संतोष शिंदे, भूषण काळे, उमेश खंडागळे, प्रकाश शेंडगे, मनोज साठे, गोपाल शिंदे, संजय पाटील, रविंद्र शेंडगे, महेंद्र माने, सुभाष तनमोर, शशि साळुंखे, विठ्ठल मलपे, संतोष शेळके, नितिन पाटील, दिपक वाघमारे, कुंडलिक खुर्द यांनी प्रयत्न केले.
























