जेऊर – शेटफळ तालुका करमाळा येथे शिवस्मारक समिती व ग्रामस्थांच्या वतीने जिजाऊ जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी यावेळी गावातील जेष्ठ नागरिक प्रल्हाद पोळ यांच्या हस्ते जिजाऊंच्या प्रतिमेचे व छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचे पूजन करण्यात आले.
यानंतर इरा पब्लिक स्कूल मधील विद्यार्थ्यांनी व उपस्थितांकडून जिजाऊ वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली यावेळी जिजाऊंच्या जीवन चरित्रावर भाषणे झाली.
या कार्यक्रमाला हनुमंत घोगरे, अमोल घोगरे, सुहास पोळ, ज्ञानेश्वर लगड, संजय पोळ, नागनाथ पोळ, सुरज पोळ सुदर्शन पवार शंकर पोळ, श्रीकृष्ण लबडे सिताराम मोरे, बापूराव पोळ लहू पोळ नाना पोळ विशाल पोळ ज्ञानेश्वर पोळ ऋषिकेश पोळ निलेश गायकवाड यांच्यासह ग्रामस्थ व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते


















