जिओ ही दूरसंचार क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी आहे. देशभरात या कंपनीच्या सेवांचा अपयोग करणाऱ्या कोट्यवधी संस्था आहेत. मात्र सध्या देशभरातील जिओ नेटवर्कची सेवा डाऊन झाल्याची तक्रार वापरकर्त्यांनी केली आहे. जिओ नेटवर्क डाऊन झाल्यानं अनेकांना इंटरनेट उपलब्ध होत नव्हतं. व्हाटसअॅप, इन्स्टाग्राम, एक्स, स्नॅपचॅट, यूट्यूब वापरण्यात अनेकांना अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे जिओच्या सर्व्हिसेस वापरणाऱ्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
डाऊन डिटेक्टरच्या माहितीनुसार 54 टक्के वापरकर्त्यांनी मोबाईल इंटरनेट संदर्भात, 38 टक्के तक्रारी जिओ फायबरसंदर्भात तर 7 टक्के तक्रारी जिओच्या नेटवर्कसंदर्भात केल्याचं समोर आलं आहे.
जिओ नेटवर्कच्या काही वापरकर्त्यांनी जिओ कस्टमर केअर आमच्या तक्रारींना प्रतिसाद देत नाहीये, अशी तक्रार केली आहे. याबात वापरकर्त्यांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त केला आहे. यातीलच एका नेटकऱ्याने “इटरनेचा स्पीड फारच कमी झाला आहे. याबाबत मी जिओच्या कस्टमर केअरकडे तक्रार केली. पण त्यांनी थेट माझा कॉल डिस्कनेक्ट केला,” अशा भावना व्यक्त केल्या. जिओची सर्व्हिस डाऊन झाल्यानंतर समाजमाध्यमांवर अनेक मीम्सचा पाऊस पाडला.