सांगोला – मला एकदाच संधी द्या. पुढील पाच वर्षे मी तुमचा सालगडी म्हणून प्रामाणिकपणे काम करेन, असे भावनिक आवाहन चोपडी जि.प.गटाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार चेतनसिंह केदार सावंत यांनी केले. गटातील कारंडेवाडी (बुद्धेहाळ), सोमेवाडी, कारंडेवाडी (उदनवाडी) येथील गावभेट दौऱ्यात बोलताना त्यांनी सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांवर ठाम भूमिका मांडत गावातील समस्या, अडचणी जाणून घेतल्या.
यावेळी भाजपचे मंडल अध्यक्ष दुर्योधन हिप्परकर, चोपडीचे उपसरपंच पोपटशेठ यादव, सुभाष गोडसे, सोमेवाडी येथील शिवसेनेचे नारायण गळवे, भारत गोडसे, चंदू चौगुले, सुखदेव करांडे, मुक्ताआप्पा करांडे, सुमित करांडे, सत्यवान गाडे, बाबू करांडे, बजरंग करांडे, सुशांत करांडे, लक्ष्मण करांडे, बाळू टोणे, सुरेश करांडे, वसंत करांडे, सुरेश चौगुले, संजय शेळके, माऊली बनसोडे, सुधीर खांडेकर, केशव काळेल, हणमंत विटेकर, अजित काळेल, औदुंबर गोडसे, विठ्ठल बंदवडे, सिद्धेश्वर शेळके, अशोक ठोंबरे, तात्या खोकले ,राजू गेनुरे, अशोक शेळके, राजू शेळके, गुंडा ठोंबरे, महादेव चौगुले, अशोक वाघमारे, सिद्धेश्वर बंदवडे, बाळू खोकले, अभि शेळके उपस्थित होते.
जिल्ह्याचे पालकमंत्री ना.जयकुमार गोरे यांच्याकडे ग्रामविकास मंत्रालयाचा कारभार असल्यामुळे गावपातळीवरील रस्ते, पाणी, वीज, स्मशानभूमी यांसह सर्व मूलभूत समस्यांवर निश्चितपणे तोडगा काढला जाईल. मी आश्वासन देणारा नेता नाही, तर जनतेच्या अडीअडचणी, समस्या प्रत्यक्ष सोडवून काम करणारा एक कार्यकर्ता आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपची सत्ता येणार असून जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा भाजपचाच होणार, यात कोणतीही शंका नाही. त्यामुळे कमळाला दिलेले एकही मत वाया जाणार नाही. भाजपच्या माध्यमातून चोपडी जि.प.गटाचा सर्वांगीण विकास साधला जाईल. मला मतरूपी जनतेचे आशीर्वाद द्या. मला एकदाच संधी दिलीत, तर या गावासह संपूर्ण गटाचा चेहरामोहरा बदलल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असा ठाम आश्वासन यावेळी चेतनसिंह केदार सावंत यांनी उपस्थित नागरिकांना दिला.
























