बार्शी – कै. सुभाष गणपत काळे यांचे स्मरणार्थ दि.१ फेब्रुवारी रोजी बार्शी येथे राहुल सुभाष काळे यांनी त्यांचे वडिलांचे स्मरणार्थ जागरण गोंधळ कार्यक्रम गेले १३ वर्षांपासून आयोजित करत आहेत. सदर कार्यक्रमामध्ये सोलापूर जिल्ह्यातील जातिवंत पारंपारिक एकूण ९ वाघ्यामुरळी पार्टी यांनी कार्यक्रम सदर केला. सांगोला, करमाळा, बार्शी, अनगर, माढा, पंढरपूर येथून वाघ्या मुरळी पार्टी आले होते .
तसेच सदर कार्यक्रमास महाराष्ट्राचे महानगायक साजन बेंद्रे यांनी उपस्थित राहून कार्यक्रम सादर केला व सदर कार्यक्रमास बार्शी येथील विविध क्षेत्रातील लोकांनी हजेरी लावून शुभेच्छा दिल्या. सदर कार्यक्रमात वाघ्या मुरळी पार्टीला ढाल श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.

















