कुर्डूवाडी – दि.१ मार्च रोजी सोलापूर जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ आयोजित आदर्श विज्ञान शिक्षक व आदर्श शाळा पुरस्कार सोहळा समारंभ संपन्न झाला. या या कार्यक्रमासाठी पुणे विभाग शिक्षक संघटनेचे माजी आमदार दत्तात्रय सावंत सर , व नूतन जिल्हा परिषद सदस्य रश्मी बागल , गटशिक्षणाधिकारी नितीन कदम ,अध्यक्ष सोलापूर जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ संजय जवंजाळ ,सचिव सोलापूर जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ डॉ. नूर अहमद कारंजे , माढा तालुका अध्यक्ष विज्ञान मंडळ अभय महाजन, यांच्या हस्ते कै.विठ्ठलरावजी शिंदे प्रशाला अंबाड या शाळेस आदर्श शाळा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी प्रशालेचे प्राचार्य श्री जवानसिंग रजपूत, प्रशालेचे जेष्ठ शिक्षक मच्छिंद्र पाटील, जूनियर कॉलेज विभाग प्रमुख विष्णू घाडगे, यशवंत प्रायमरी स्कूलचे प्राचार्य सोमनाथ होनमोठे , व प्रशालेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
या पुरस्कारामुळे संस्थेचे चेअरमन माजी आमदार संजय मामा शिंदे व माजी आमदार बबनरावजी शिंदे यांनी प्रशालेचे अभिनंदन केले पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.



























