आष्टी व हादगाव येथे कपिल आकात यांचा संवाद दौरा
परतूर: प्रतिनिधी
परतूर-मंठा विधानसभा मतदार संघातील आष्टी(धो.जो.) येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्ष शरद पवार चे जिल्हाध्यक्ष कपिल भैय्या आकात यांनी आगामी विधानसभा निवडणुकी निमित्त “आष्टी व हादगाव” या दोन्ही सर्कलचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा संवाद दौरा व बूथ कमिटी मेळावा घेतला.
यावेळी कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून बा.स.चे उपसभापती गोपाळराव बोराडे तर उद्घाटक म्हणून पंकज नाना बोराडे तसेच तालुकाध्यक्ष निळकंठ नाना तौर,बबनराव गनगे,युवक तालुकाध्यक्ष ओंकार काटे,माजी प.स.सदस्य मनोहरराव पवार,भगवान राठोड,गणेश जीजा सोळंके,ओ.बी.सी.चे तालुकाध्यक्ष भागवत चव्हाण,भगवानराव थोरात,सत्तार मास्टर,,वसंतराव जगताप,अमर केंधळे,प्रवीण चौरे,कुंडलिक बहिरठ,बबनराव चव्हाण,विलास ठोंबरे,गोविंद वाशिंबे,बाबासाहेब बागल तसेच दोन्ही सर्कल मधील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.