सोलापूर – महापालिका निवडणुकीत पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड बहुमत मिळवले आहे. त्या पार्श्वभूमीवर पक्षासाठी सतत झटत असणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी मिळावी यासाठी भाजपचे चिटणीस अमोल कारंडे यांना
स्वीकृत नगरसेवक मिळावे यासाठी धनगर समाजाच्या शिष्टमंडळाने नुकतीच पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेतली. यावेळी गोरे यांनी उपस्थितांना माझ्या शिफारस पत्रात अमोल कारंडे यांचे नाव नक्की असणार मात्र निर्णय पक्ष पातळीवर होईल असा विश्वास व्यक्त केला आहे.
भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस तथा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक समितीचे सदस्य, धनगर समाज संघर्ष समितीचे समन्वयक अमोल कारंडे यांची सोलापूर महानगरपालिका स्वीकृत सदस्य पदी नियुक्ती करावी यासाठी धनगर समाजाच्या वतीने शनिवारी बालाजी सरोवर येथे पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेऊन शिष्ठमंडळाने मागणी केली.
महापालिका निवडणुकीत त धनगर समाजाचे जवळपास 11 नगरसेवक निवडून आले आहेत. तर निवडणुकीत समाज सातत्याने भाजपाच्या पाठीशी उभा राहिला आहे. अमोल करंडे यांनी गेल्या 15 ते 20 वर्षोत विविध सामाजिक उपक्रमात सहभाग घेऊन अनेक समाज उपयोगी कामे केली आहेत. तसेच पक्षासाठी संघटन करून पक्षाला महापालिका निवडणुकीत ताकद देण्याचे काम केले आहे. त्यामुळे कारंडे यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून भाजपाच्या गोटातून संधी द्यावी अशी मागणी शिष्टमंडळाने केली.
यावेळी मंद्रूप मठाचे मदगुंडेश्वर महाराज, कलाप्पावाडी मठाचे मठाधीश सद्गुगुरु अमुकसिद्ध महाराज, औज मठाचे श्री रेवणसिद्धेश्वर महाराज, बिळेणी कनपवडीयार, समीर सलगर, भाजपाचे प्रदेश सचिव माऊली हळनवर, सिद्धाराम होनमाने, अमोगसिद्ध देशमुख, आप्पासाहेब चितापुरे, दर्याप्पा अकलवाडे, नामदेव महाराज पोकळे, अविनाश ठेंगे, पद्मयोगी वडरे, बनसिद्ध बन्ने, राजू हलमणी, समाधान वाघमोडे, सरपंच अमोल थोरात, नवनाथ गुरव, महेश गुंडे कार्यकारी आदी उपस्थित होते.
























