श्रीपूर – श्रीपूर ता . माळशिरस येथिल चंद्रशेखर विद्यालयाच्या क्रिडा सहशिक्षिका करुणा धाईंजे यांना सोलापूर भारत स्काऊटस् आणि गाईड यांच्या वतीने जिल्हा स्तरिय उत्कृष्ठ गाईडर पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले .
सदर पुरस्कार सचिन जगताप जिल्हा आयुक्त स्काऊट तथा शिक्षणाधिकारी यांचे हस्ते तर विठ्ठल ढेपे जिल्हा चिटणीस व उपशिक्षणाधिकारी , अनुसया शिरसाट जिल्हा संघटक गाईड , श्रीधर मोरे जिल्हा संघटक स्काऊट , रूपाली भाऊसार जिल्हा आयुक्त गाईड तथा उपशिक्षणाधिकारी , कादर शेख जिल्हा मुख्य आयुक्त यांचे उपस्थितीत देवून गौरविणेत आले .
करुणा धाईंजे यांनी शालेय जीवना पासूनच क्रिडा क्षेत्राला प्राधान्य देवून आपली वाटचाल चालू केली होती . विशेषतः भाला फेकी मध्ये त्यांनी राज्य व राष्ट्रीय स्तरावर चांगली कामगीरी करत अनेक पुरस्कार मिळवले आहेत तसेच महिलांचे कुस्ती क्षेत्रातही त्यांचा दबदबा होता . त्यांचे अंगी असणाऱ्या गुणांमुळे चंदशेखर विद्यालय तथा आबासाहेब चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ . रामदास देशमुख यांनी त्यांना सह क्रिडा शिक्षक म्हणून संधी दिली.
या माध्यमातून त्यांनी विद्यालयातील विद्यार्थीनीं व विद्यार्थ्यांना राष्ट्रीय पातळीवर स्काऊट ॲन्ड गाईड शिबीरा साठी संधी उपलब्ध करून दिली आहे . त्यांच्या या कार्याची दखल घेवून करुणा धाईंजे यांना जिल्हा स्तरीय उत्कृष गाईड पुरस्काराने सन्मानित करण्यात आले . त्यांचे शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा जाधव , स्काऊट गाईड लिडर व उपमुख्याध्यापक शंकर यादव , सर्व शिक्षक , कर्मचारी यांनी अभिनंदन केले .






















