भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे स्थान क्रिकेट विश्वात खूपच महत्वाचे आहे. अगदी लहानांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वचजण धोनीचे चाहते आहेत. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने एकदिवसीय आणि टी-20 विश्वचषकाशिवाय आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. तसेच महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आयसीसी कसोटी क्रमवारीत नंबर-1 बनला आहे.
अशातच आता महेंद्रसिंग धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केलं आहे. मात्र तो अजूनही आयपीएलमध्ये खेळत आहे. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने आयपीएल 2023 चे विजेतेपद पटकावले आहे. पण भारताच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक महेंद्रसिंग धोनीच्या मालमत्तेबद्दल तुम्हाला माहिती आहे का? तर जयाबाबत आपण आज सविस्तर माहिती जाणून घेऊयात…
महेंद्रसिंग धोनीची एकूण संपत्ती जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. वास्तविक, कॅप्टन कूलची एकूण संपत्ती 1040 कोटी रुपये आहे. पण महेंद्रसिंग धोनी क्रिकेट व्यतिरिक्त कुठून कमावतो हे तुम्हाला माहिती आहे का? महेंद्रसिंग धोनीचा आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्जसोबतचा वार्षिक करार 12 कोटी रुपयांचा आहे.
याशिवाय तो अनेक प्रसिद्ध कंपन्यांच्या जाहिराती देखील करतो. महेंद्रसिंग धोनीचे इन्स्टाग्रामवर ४४ मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. तर ट्विटरवर माहीच्या चाहत्यांची संख्या अंदाजे ८.६ दशलक्ष पेक्षा जास्त आहे. तसेच कॅप्टन कूल रिअल इस्टेट गुंतवणुकीतून वर्षाला करोडो रुपये कमावतो.
महेंद्रसिंग धोनीचे डेहराडूनमध्ये एक आलिशान घर आहे. माहीच्या बाईक कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर जवळपास प्रत्येक मोठ्या कंपनीच्या लक्झरी बाइक्स त्याच्याकडे आहेत. याशिवाय महेंद्रसिंग धोनीकडे मर्सिडीजसह अनेक आलिशान गाड्या आहेत. कॅप्टन कूल Jio Cinema, Unacademy, Oppo, Reebook आणि Lava सारख्या अनेक मोठ्या कंपन्यांची जाहिरात देखील करतो. महेंद्रसिंग धोनी या जाहिरातींमधून करोडो रुपये कमावतो. अशाप्रकारे मैदानाव्यतिरिक्त माही मैदानाबाहेरही खूपचं यशस्वी आहे.
यासह माही इंडियन सुपर लीगच्या चेन्नईयन एएफसी फुटबॉल संघाचा मालक आहे. तो रांची रेज हॉकी संघाचा सह-मालक देखील आहे. धोनीने बंगळुरूमध्ये ‘एमएस धोनी ग्लोबल स्कूल इंग्लिश मीडियम’ नावाने शाळा सुरू केली आहे. एमएसची ड्रोन कंपनी आणि फूड कंपनीसोबत भागीदारी आहे. रांचीमध्ये एक हॉटेल देखील आहे, जे माहीच्या मालकीचे आहे आणि त्याचे नाव माही रेसिडेन्सी आहे.
MS धोनीच्या घराची किंमत किती आहे?
करोडोंची कमाई करणाऱ्या एमएस धोनीकडे रांची आणि डेहराडूनमध्ये आलिशान घरे आहेत. तो रांचीमधील कैलाशपती नावाच्या फार्महाऊसमध्ये आपली मुलगी जीवा आणि पत्नी साक्षीसोबत राहतो. या फार्महाऊसचे नाव कैलाशपती आहे आणि रिपोर्ट्सनुसार याची किंमत सुमारे 6 कोटी रुपये आहे. याशिवाय धोनीकडे मुंबई आणि डेहराडूनमध्ये एक आलिशान बंगला आहे, जो त्याने 2011 मध्ये सुमारे 17.8 कोटी रुपयांना खरेदी केला होता.
माही अनेक मोठ्या ब्रँडची ब्रँड ॲम्बेसेडर आहे. यामध्ये Viacom 18, Dhoni is the brand ambassador of big giants like Spartan Sports, Boost, Amity University, Reebok, Gulf Oil, McDowell’s Soda, Big Bazaar, Exide Batteries, TVS Motors, Sony Bravia, Lays Wafers, Lafarge Customer Service यांसारख्या मोठ्या दिग्गजांचा ब्रँड ॲम्बेसेडर आहे.
माहीच्या ब्रँड्सचे समर्थन
सध्या एमएस धोनीच्या समर्थनांची यादी बरीच मोठी आहे. तो 36 ब्रँड्सला मान्यता देत आहे. Mahi Oreo, Orient, Sonata, India Cements, Dream11, Lava, Spartan Sports, Reebok, Cello, Siyarams, Sound Logic, Indigo Paints, Exide, Mastercard India, Sumadhura, Gulf Oil India, Snickers India, Netmeds.com, Revital H, माही Unacademy, Winzo, WardWiz इत्यादी ब्रँड्सचे समर्थन करत आहे.
महेंद्रसिंग धोनीला मिळालेले पुरस्कार
धोनीला 2008 मध्ये भारताचा सर्वोच्च क्रीडा सन्मान मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार मिळाला आणि भारत सरकारने त्याला 2009 मध्ये भारताचा चौथा नागरी पुरस्कार, पद्मश्री आणि तिसरा नागरी पुरस्कार, पद्मभूषण देऊन सन्मानित केले आहे. धोनी हा जगातील एकमेव कर्णधार आहे ज्याने तीनही क्रिकेट विश्वचषक, ICC पुरुष T20 विश्वचषक आणि ICC चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. धोनीला भारतीय सैन्याच्या पॅराशूट रेजिमेंटमध्ये लेफ्टनंट कर्नलचे मानद पद मिळाले आहे. 2011 मध्ये त्याला भारतीय सैन्याने एक क्रिकेटपटू म्हणून देशासाठी केलेल्या सेवेबद्दल प्रदान केले होते.
महेंद्रसिंग धोनीची आयपीएल कारकीर्द
महेंद्रसिंग धोनीने आयपीएलच्या 250 सामन्यांमध्ये 5082 धावा केल्या आहेत. तर सर्वोत्तम धावसंख्या 84 धावांची आहे. त्याचवेळी कॅप्टन कूलचा स्ट्राइक रेट 135.96 आणि सरासरी 39.09 होता. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने 2010 मध्ये पहिल्यांदा आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते. यानंतर महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने आयपीएल 2011, आयपीएल 2018 आणि आयपीएल 2021 आणि 2023 मध्ये ट्रॉफी जिंकली आहे.