स्वदेशीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या भारतीय नौदलाने ड्रेस-कोडशी संबंधीत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता नौदलात जेवणाची मेस व इतर ठिकाणी जवानांना स्लीव्हलेस जॅकेट, बूट, सँडल आणि कुर्ता-पायजमा घालता येणार आहे. यासंदर्भात नौदलाने सर्व कमांडला आदेश दिले आहेत.
नौदलाने कुर्ता-पायजमाचा रंग, कट आणि आकार याबाबत काटेकोर मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. सॉलिड टोन’ कुर्ता असावा. कुर्त्याची लांबी फक्त गुडघ्यापर्यंत असावी. कमरपट्टा आणि साइड पॉकेट्स असलेला पायजमा असावा. ‘मॅचिंग पॉकेट स्क्वेअर’ स्लीव्हलेस आणि स्ट्रेट कट वास्कट असे जॅकेट घालता येईल. ब्लू आणि नेव्ही ब्ल्यू अशा दोन रंग संगतीत हा कुर्ता पायजमा असणार आहे. ‘कुर्ता-चुरीदार’ किंवा ‘कुर्ता-पलाझो’ घालू इच्छिणाऱ्या महिला अधिकाऱ्यांसाठीही अशाच सूचना आहेत. हा नवीन ड्रेस कोड युद्धनौका किंवा पाणबुड्यांना लागू असणार नाही. गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये याबाबत चर्चा करण्यात आली होती. आर्मी, एअरफोर्स आणि नेव्हीच्या मेसमध्ये पुरुष कर्मचारी तसेच पाहुण्यांसाठी यापूर्वी कुर्ता-पायजमा घालण्यावर बंदी होती.