लातूर महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे, ही भरती प्रक्रिया एकूण १७ संवर्गातील रिक्त जागा भरण्यासाठी होणार आहे.
लातूर शहर महानगरपालिका आस्थापनेवरील श्रेणी-अ, श्रेणी-ब व श्रेणी-क मधील रिक्त असणारी पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रस्तुत जाहिरातीमधील पदे ही प्रशासकीय, तांत्रिक, विधी, पर्यावरण अभियांत्रिकी सेवा, वैद्यकीय सेवा, अभियांत्रिकी सेवा, निम वैद्यकीय सेवा व अग्निशमन सेवेमधील आहेत. तब्बल ८० जागांसाठी ही भरती प्रक्रिया घेण्यात येणार असून, २२ डिसेंबर २०२३ सायंकाळी ४ वाजल्यापासून १४ जानेवारी २०२४ रात्री ११.५९ पर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
इच्छुक उमेदवारांनी लातूर शहर महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाइटच्या माध्यमातून विहित कालावधीमध्ये अर्ज करायचे आहेत.
पदभरतीचा तपशील :
लातूर महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी भरतीची प्रक्रिया एकूण १७ संवर्गातील रिक्त जागा भरण्यासाठी होणार आहे.
पर्यावरण संवर्धन अधिकारी : १ जागा
सिस्टीम मॅनेजर ई-प्रशासन : १ जागा
वैद्यकीय अधीक्षक (मनपा दवाखाने विभाग) : १ जागा
शाखा अभियंता (स्थापत्य) : २ जागा
विधी अधिकारी : १ जागा
अग्निशमन केंद्र अधिकारी : १ जागा
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) : ४ जागा
कनिष्ठ अभियंता (पा/पु) : ४ जागा
कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) : १ जागा
कर अधीक्षक : २ जागा
औषधनिर्माता (फार्मसिस्ट) : १ जागा
सहाय्यक कर अधीक्षक : ४ जागा
कर निरीक्षक : ४ जागा
चालक यंत्रचालक : ९ जागा
लिपिक टंकलेखक : १० जागा
फायरमॅन : ३० जागा
व्हॉलमॅन : ४ जागा
(अधिक महितीसाठी लातूर महानगरपालिकेची अधिकृत जाहिरात वाचा)
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
- सदर भरतीमधील सहभागासाठी उमेदवार दहावी ते बारावी पास तसेच पदवीधारक / डिप्लोमा धारक असणे गरजेचे आहे.
-
- इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
- खाली दिलेल्या लिंकवरून दिलेल्या तारखेपर्यंत उमेदवाराने अर्ज सादर करायचे आहेत.
ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी वेळापत्रक :
- ऑनलाइन पद्धतीने अर्ज नोंदणीला सुरुवात : २२ डिसेंबर २०२३, सायंकाळी ४ वाजल्यापासून
- ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिवस : १४ जानेवारी २०२४, रात्री ११.५९ वाजेपर्यंत
- ऑनलाइन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची शेवटची तारीख : १४ जानेवारी २०२४, रात्री ११.५९ वाजेपर्यंत
- परीक्षेसाठी ऑनलाइन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिवस : परीक्षेच्या ७ दिवस आधी
- ऑनलाइन परीक्षेची तारीख : जानेवारी / फेब्रुवारी २०२४ (संभाव्य)
(परीक्षेची तारीख, वेळ आणि केंद्र प्रवेशपत्रामध्ये नमूद केले जाईल. संभाव्य बदलबाबत वेळोवेळी लातूर सहर महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर माहिती उपलब्ध करून दिले जाईल)
ही भरती प्रक्रिया विविध पदांवर होणार असून यामध्ये उमेदवाराला पगार हा पदानुसार वेगवेगळा दिला जाणार आहे. यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय खुल्या प्रवर्गासाठी ३८ वर्ष तर राखीव प्रवर्गासाठी ४३ वर्षापर्यंत असावे, यामध्ये नोकरीचे ठिकाण लातूर असून, उमेदवाराला कमीत कमी १५,००० ते १,७७,५०० रुपये पदानुसार देण्यात येणार आहे.
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना :
० उमेदवार हा भारतीय नागरिक असावा.
० मान्यताप्राप्त विद्यापीठातून कमीत कमी बारावी ते पदवीधर पर्यंत शिक्षण असावे तसेच उमेदवाराला मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
० उमेदवारांनी अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे देखील अपलोड करायचे आहेत.
० दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
महत्त्वाच्या लिंक्स :
लातूर शहर महानगरपालिकेच्या भरतीची अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
लातूर शहर महानगरपालिकेच्या भरतीमध्ये ऑनलाइन अर्ज करण्यासाठी आणि अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.