Monday, February 2, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

सरकारी शिष्टमंडळ येण्यापूर्वी राजेश टोपे तडकाफडकी जालन्यात लक्ष्मण हाकेंच्या भेटीला, स्टेजवर फक्त 5 मिनिटं बसले अन्..

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
June 22, 2024
in political
0
सरकारी शिष्टमंडळ येण्यापूर्वी राजेश टोपे तडकाफडकी जालन्यात लक्ष्मण हाकेंच्या भेटीला, स्टेजवर फक्त 5 मिनिटं बसले अन्..
0
SHARES
57
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

राज्यात ज्या प्रमाणे मराठा समाजाच्या विकासासाठी मंत्र्यांची उपसमिती नेमण्यात आली आहे त्याचप्रमाणे आता ओबीसी समाजाच्या विकासासाठीही ओबीसी नेत्यांची उपसमिती निर्माण करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. जालना: ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरुन जालन्यातली वडीगोद्री येथे लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचे प्राणांतिक उपोषण सुरु आहे. आज त्यांच्या उपोषणाचा दहावा दिवस आहे. शुक्रवारी मुंबईत पार पडलेल्या बैठकीनंतर आणखी एक सरकारी शिष्टमंडळ लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांना येऊन भेटणार आहे.

मात्र, त्यापूर्वी शनिवारी सकाळी शरद पवार गटाचे आमदार राजेश टोपे (Rajesh Tope) तडकाफडकी वडीगोद्री येथे दाखल झाले. त्यांनी याठिकाणी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे या दोघांची भेट घेतली. उपोषणाच्या व्यासपीठावर  साधारण पाच मिनिटं थांबून राजेश टोपे येथून निघाले. यावेळी प्रसारमाध्यमांनी राजेश टोपे यांना, तुम्ही स्थानिक लोकप्रतिनिधी असूनही लक्ष्मण हाके यांच्या उपोषणस्थळी इतक्या उशीरा का आलात, असा प्रश्न  विचारला. त्यावर राजेश टोपे यांनी म्हटले की,

आपण सेक्युलर विचाराचे आहोत. आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारने सामंजस्याने तोडगा काढणे गरजेचे आहे. कुठेही समाजात तेढ निर्माण होऊ नये, अशा स्वरुपाने हा निर्णय घेणे अपेक्षित आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून मला याठिकाणी येऊन भेट द्यावी, असे मला वाटले. त्यासाठी मी आज याठिकाणी आलो. गेल्या पाच-सहा दिवसांमध्ये मी मुंबई, पुण्याला, पंढरपूरमध्ये होतो. आरक्षणाचा प्रश्न सामंजस्याने सुटावा. महाराष्ट्र हा साधूसंतांचा, वारकरी संप्रदायाचा आणि समाजसुधारकांचा आहे. त्यामुळे इकडे कोणतीही तेढ निर्माण होऊ नये, असे मला वाटत असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले.  मराठा आरक्षणाला विरोध नाही,

पण आमच्यात येऊ नका; ओबीसी आंदोलकांची प्रतिक्रिया प्राध्यापक लक्ष्मण हाके यांचे गेल्या 10 दिवसांपासून जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथे उपोषण सुरू आहे. त्यांच्या या उपोषणाला वाढता पाठिंबा हा नांदेड जिल्ह्यातून मिळत आहे.  सलग दुसऱ्या दिवशी सुध्दा लक्ष्मण हाके याना पाठींबा देण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील भोकर येथील ओबीसी समाज बांधवांचा आतापर्यंत 300 गाड्याचा ताफा हा जालना येथील वडीगोद्री येथे रवाना झाला आहे. शनिवारी सकाळी 100 गाड्या या वडीगोद्री येथे रवाना झाल्या आहेत. आम्हाला आरक्षण  संविधानाने दिलेले आहे. मराठा आरक्षण त्यांना मिळाले पाहिजे, पण त्यांना आमच्यातून आरक्षण देऊ नये, अशी मागणी या ओबीसी आंदोलकांनी केली.

भुजबळांसह सहा मंत्री लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारेंना भेटणार मुंबईत काल पार  पडलेल्या बैठकीनंतर आज राज्य सरकारचे शिष्टमंडळ जालन्यात जाऊन लक्ष्मण हाके यांची भेट घेणार आहे. छगन भुजबळ यांच्यासह सहा मंत्री या शिष्टमंडळात असतील. हे शिष्टमंडळ सकाळी 11 वाजता पुणे जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील येथे ओबीसी आंदोलक अॅड.मंगेश ससाणे यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर दुपारी 2 वाजता वडीगोद्री येथे ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची भेट घेणार आहे. या शिष्टमंडळात छगन भुजबळ, गिरीश महाजन, अतुल सावे,  उदय सामंत, धनंजय मुंडे, संदीपान भुमरे, गोपीचंद पडळकर आणि प्रकाश शेंडगे यांचा समावेश असेल.

Post Views: 14
Previous Post

चिकू फळपिकासाठी फळपिक विमा योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत 30 जून

Next Post

‘भाईजान’च्या घरावर गोळीबार करायला कोणी सांगितलं?

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
‘भाईजान’च्या घरावर गोळीबार करायला कोणी सांगितलं?

'भाईजान'च्या घरावर गोळीबार करायला कोणी सांगितलं?

ताज्या बातम्या

हायस्पीड रेल्वे कॉरिडोरमुळे सोलापूरच्या विकासालाही मिळणार गती#aajsolapur #viral #public #news

February 1, 2026

रस्त्यावर अपघातप्रवण चार ठिकाणी गतीरोधक बसवले; नगराध्यक्ष दोसानी यांचे आभार

February 1, 2026

पंजाब राज्यातील विविध जिल्ह्यातुन आलेल्या सरपंच व अधिकारी यांचें विष्णुपुरी येथे स्वागत

February 1, 2026

पांगरगावचा शिध्दोधन शिंदे केंद्रीय राखीव पोलीस दलात

February 1, 2026

कंधार येथील सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा कार्यकारिणी जाहीर

February 1, 2026

होटाळा जि प शाळेच्या मुख्याध्यापिका वर्षा चालिकवार यांचे राज्यस्तरीय शब्दकोडे स्पर्धेत दैदीप्यमान सुयश

February 1, 2026

आ. बोंढारकर यांच्या संकल्पनेतून गोदावरी जलपूजन आणि शुद्धीकरण अभियानास प्रारंभ

February 1, 2026

स्व. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मारकासाठी धनाजी जोशी यांचे निवेदन

February 1, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

सोलापूर महापालिकेत भाजपाची सत्ता स्थापनेची तयारी अंतिम टप्प्यात; ८७ नगरसेवक गट नोंदणीसाठी पुण्याकडे रवाना

byतरुण भारत
February 1, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक आणि भरघोस यश मिळवत स्पष्ट बहुमताची मजल मारली आहे. या विजयामुळे महापालिकेत...

शिवसेना गटनेतेपदी अमोल शिंदे यांची निवड

byतरुण भारत
January 29, 2026
0

सोलापूर : महानगरपालिकेतील राजकीय हालचालींना वेग आला असून, शिवसेनेच्या (शिंदे गट) गटनेतेपदी अमोल बाळासाहेब शिंदे यांची निवड करण्यात आली आहे....

वापरा आणि फेका हे भाजपचे धोरण; भाजप हा कूटनीती, षडयंत्र, कारस्थान करणारा पक्ष –  सुषमा अंधारे 

byतरुण भारत
January 26, 2026
0

सोलापूर : भारतीय जनता पक्ष हा धुतल्या तांदळासारखा, सत्शील पक्ष नसून कूटनीती, षडयंत्र, कपटनीती, कारस्थान करणारा पक्ष आहे.वापरा आणि फेका...

दक्षिणमध्ये काॅंग्रेसला धक्का : युवक काॅंग्रेस तालुका कार्याध्यक्ष सचिन व्हनमाने यांनी दिला राजीनामा

byतरुण भारत
January 23, 2026
0

सोलापूर - ऐन निवडणूकीच्या तोंडावर युवक काॅंग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष सचिन व्हनमाने यांनी पक्षातील वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून राजीनामा दिला आहे. लवकरच...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0652482

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697