सांगोला – गोरगरीब वंचितांच्या दारी पोहोचून मदत करणाऱ्या आपुलकी प्रतिष्ठानला यापुढील काळात आपले सहकार्य राहील असे अभिवचन माजी दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी दिले. त्यांनी सांगोल्यातील आपुलकी प्रतिष्ठानच्या कार्यालयास सदिच्छा भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते.
महादेव जानकर पुढे म्हणाले, गोरगरीब, वंचित, दिव्यांग, एकल महिला आदींच्या समस्या जाणून त्यांच्यासाठी कार्यरत राहणे ही खरी काळाची गरज असून आपुलकी प्रतिष्ठानचे चालू असलेले हे कार्य खरोखरच कौतुकास्पद असल्याचे सांगत प्रतिष्ठानच्या कार्याला शुभेच्छा दिल्या.
यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र यादव यांनी आपुलकीच्या चालू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली व त्यांचा यथोचित सन्मान केला. याप्रसंगी रासप सोलापूर जिल्हाध्यक्ष अनिल शेंडगे, आपुलकीचे सचिव संतोष महिमकर, दत्तात्रय नवले, प्रमोद दौंडे, सोमनाथ माळी, अशोक सावंत, प्रभात जाधव, संदीप खाटपे उपस्थित होते.




















